नवी दिल्लीः लवकरच आपल्या स्मार्टफोन्सच्या यादीत आणखी एक नवीन स्मार्टफोनचा समावेश करू शकते. नुकतीच रेडमीचा मॉडल नंबर M2010J19ST च्या एका स्मार्टफोनला थायलंडच्या सर्टिफिकेशन वेबसाइट NBTC ने सर्टिफाय केले आहे. लिस्टिंगनुसार, या अपकमिंग फोनचे नाव असणार आहे. हा फोन एका सध्या असलेल्या रेडमी (रेडमी ९ पॉवर) चे रिब्रँडेड व्हर्जन म्हणून लाँच केले जावू शकते. वाचाः NBTC वर दिसलेल्या रेडमी ९ टी च्या मॉनिकरवरून युजर्समध्ये खूप उत्सूकता वाढली आहे. लिस्टिंगमध्ये कन्फर्म करण्यात आलेले आहे की हा फोन एलटीई कनेक्टिविटी सपोर्ट सोबत येणार आहे. नुकत्याच आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, कंपनी या फोनला ग्लोबल मार्केटमध्ये Redmi 9T या नावाने लाँच करू शकते. वाचाः Redmi 9T मिळू शकतात हे फीचर्स या अपकमिंग फोनमध्ये ६.५३ इंचाचा वॉटरड्रॉप नॉच आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो. फुल एचडी प्लस रिझॉल्यूसन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये आस्पेक्ट रेशियो 19.5:9 असू शकतो. फोनला ६ जीबी रॅम पर्यंत तसेच १२८ जीबी स्टोरेज पर्यंत लाँच केले जावू शकते. फोनमध्ये कंपनी मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट सुद्धा देवू शकते. वाचाः या फोनमध्ये अँड्रॉयड 10 वर बेस्ड MIUI 12 सोबत येवू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे मिळू शकतात. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे मिळू शकतात. साइट फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येणाऱ्या या फोनमध्ये १८ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 6000mAh बॅटरी दिली जावू शकते. फोनला पुढील वर्षीच्या सुरुवातीला लाँच केले जावू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aOePSr
Comments
Post a Comment