Redmi 9 Power चा आज दुपारी १२ वाजता पहिला सेल, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः शाओमीचा प्रसिद्ध ब्रँड रेडमीचा पॉवरफुल आणि जबरदस्त फीचर्स असलेला चा आज दुपारी १२ वाजता अॅमेझॉनवर पहिला सेल सुरू होणार आहे. या फोनला याच महिन्यात भारतात लाँच करण्यात आले आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी 6,000mAh दिली आहे. वाचाः जबरदस्त डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसर रेडमीने गेल्या काही दिवसांत भारतात Redmi Note 9 4G ला भारतात Redmi 9 Powerच्या रुपात लाँच केले आहे. रेडमी ९ सीरीजच्या Redmi 9 Prime, Redmi 9 आणि Redmi 9A सारख्या फोनसोबत विक्री करण्यात येईल. रेडमीच्या या फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला असून याचा 1080×2340 पिक्सल आहे. रेडमीने या फोनमध्ये पॉवरफुल Qualcomm Snapdragon 662 SoC प्रोसेसर सोबत या फोनला लाँच केले आहे. वाचाः बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा Redmi 9 Power मध्ये 6000 mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. रेडमी ९ पॉवर सुद्धा पॉवरफुल आहे. यात ४८ मेगापिक्सल सोबत ४ रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स सोबत ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38t1Xhx

Comments

clue frame