नवी दिल्लीः Realme ने आज भारतात आपल्या प्रॉड्क्ट्सची रेंज वाढवत सीरीज आणि ला लाँच केले आहे. रियलमी वॉच एस प्रो ची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. तसेच वॉच एसची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. वॉचच्या मास्टर एडिशनची किंमत कंपनीने ५ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. याचा पहिला सेल २८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. रियलमी बड्स एयर प्रो मास्टर एडिशनची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. बड्स प्रो मास्टर एडिशनचा सेल ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. वाचाः रियलमी वॉच एस प्रोचे वैशिष्ट्ये रियलमी वॉच एस प्रोमध्ये 454x454 पिक्सल रेजॉलूशन सोबत १.३९ इंचाचा अमोलेड ऑल्वेज ऑन डिस्प्ले दिला आहे. हा वॉच २.५डी कॉर्निंग गोरिला ग्लाससोबत येतो. यात 5ATM वॉटक रजिस्टेंस रेटिंग सोबत स्विमिंग मोड, ड्यूल प्रोसेसर, ड्यूल सॅटेलाइट जीपीएस, हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर यासारखे फीचर्स दिले आहेत. कंपनीच्या वॉचची बॅटरी एकदा चार्ज केल्यास १४ दिवस काम करते. वाचाः वॉचमध्ये तुम्हाला १५ स्पोर्ट्स मोड दिले आहे. यात बास्केटबॉल, योगा, क्रिकेट, रनिंग सायकलिंग यासारखे मोड्स दिले आहेत. रियलमी वॉच एस प्रो चे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १०० हून जास्त वॉच फेस सोबत येते. रियलमीच्या म्हणण्यानुसार जवळपास सर्व अॅप नोटिफिकेशनला चेक केले जावू शकते. ही वॉच फोनच्या जवळ आल्यानंतर अनलॉक होते. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ ५.० मिळते. रियलमी वॉच एसचे वैसिष्ट्ये रियलमी वॉच एस मध्ये 360x360 पिक्सल रेजॉलूशन सोबत १.३ इंचाचचा सर्कुलर डिस्प्ले दिला आहे. २.५डी कॉर्निंग गोरिला ग्लास असणाऱ्या या वॉचमध्ये ऑटो ब्राइटनेस फीचर मिळते. हे फीचर १६ स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करते. ज्यात फुटबॉल, योगा, रनिंग आणि सायकलिंगचा समावेश आहे. या वॉचमध्ये 390mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यास १५ दिवसांची बॅकअप देते. वॉचला शून्य ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. वाचाः रियलमी बड्स एयर प्रो मास्टर एडिशन रियलमी बड्स एअर प्रो भारता आधीपासून उपलब्ध आहे. आता कंपनीने याचे मास्टर एडिसन लाँच केले आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे अॅक्टिव नाइज कॅन्सलेशन फीचर सोबत येते. दमदार साउंडसाठी यात 10mm चे बेस बूस्ट ड्राइवर दिले आहेत. कंपनीने यात ड्यूल माइक कॅन्सलेसन ऑफर केले आहे. यात क्विक चार्ज टेक्नोलॉजी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की १५ मिनिटाच्या चार्जिंग मध्ये सात तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34CTszn
Comments
Post a Comment