नवी दिल्लीः स्मार्टफोनला लवकरच भारतात लाँच केले जावू शकते. रियलमीने आता लाँच संबंधी कोणतीही माहिती शेयर केली नाही. परंतु, फोनला ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. यावरुन संकेत मिळत आहेत की, रियलमी क्यू २ लवकरच भारतात एन्ट्री करू शकतो. रियलमी क्यू २ ला चीनमध्ये रियलमी Q2 प्रो सोबत ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. ब्रिटनमध्ये या फोनला Realme 7 5G नावाने आणले होते. वाचाः टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी एक फोटो शेयर केला आहे. या फोटोत नवीन रियलमी फोनला बीआयएस लिस्टिंग वर मॉडल नंबर RMX2117 सोबत पाहिले गेले जावू शकते. हे मॉडल नंबर रियलमी क्यू २ लवकरच भारतात लाँच होणार आहे. Realme Q2 च्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला चीनमध्ये १२९९ चिनी युआन म्हजणजेच जवळपास १४ हजार ६०० रुपयांत तसेच ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला १३९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास १५ हजार ८०० रुपयांत लाँच केले होते. भारतात या फोनला याच किंमतीत लाँच केले जावू शकते. वाचाः Realme Q2 चे खास वैशिष्ट्ये ड्यूल सिमच्या रियलमी क्यू २ अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआयवर काम करतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायनामेंसिटी 800U चिपसेट व ६ जीबी पर्यंत रॅम दिला आहे. हँडसेटमध्ये १२८जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ते वाढवता येवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली जावू शकते. ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जावू शकतो. वाचाः फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. रियलमी क्यू २ मध्ये सेल्फी साठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mVuXUo
Comments
Post a Comment