Realme C20 लवकरच भारतात लाँच होणार, सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले मॉनिकर

नवी दिल्लीः रियलमी आपला प्रसिद्ध सी सीरीजमध्ये एक नवीन लवकरच भारतात लाँच करू शकते. नुकतीच या स्मार्टफोनला थायलँडची NBTC अथॉरिटी वरून सर्टिफिकेशन मिळाले आहे. हा फोन त्या फोनचा मॉनिकर होऊ शकतो. ज्याचा मॉडल नंबर RMX3061 आहे. फोनच्या वैशिष्ट्यांसंबंधी कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, असे मानले जात आहे की, हा एक एन्ट्री लेवल स्मार्टफोन असणार आहे. वाचाः 5000mAh च्या बॅटरीचा स्मार्टफोन या दरम्यान, आणखी एका डिव्हाइसची चर्चा सुरू आहे. याचे मॉडल नंबर RMX3063 आहे. या फोन संबंधी म्हटले जात आहे की, सीरीजचा हा नवीन डिव्हाइस असणार आहे. या मॉडल नंबर डिव्हाइसला नुकतेच BIS आणि US FCC वर स्पॉट करण्यात आले होते. या दोन्ही लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असणार आहे. वाचाः RMX3063 चे मॉनिकर असू शकते वेगळे NBTC अथॉरिटी लिस्टिंग च्या माहितीनुसार RMX3061 मॉडल नंबरचा स्मार्टफोन रियलमी सी २० असणार आहे. या लिस्टिंगमध्ये फोनच्या नावाला कन्फर्म करण्याशिवाय आणखी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तर मॉडल नंबर RMX3063 चा स्मार्टफोन या सीरीज अंतर्गत येवू शकतो. परंतु, याचे मॉनिकर वेगळे असू शकते. वाचाः टिप्स्टरने ट्विट करून दिली माहिती माय स्मार्ट प्राइसच्या एका रिपोर्टनुसार, हे दोन्ही स्मार्टफोन एकाच सीरीजचा भाग आहेत. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे दोन्ही डिव्हाइसला BIS ने सर्टिफाय केले आहे. BIS कडून सर्टिफाय केल्याची माहिती टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मॉडल नंबर RMX3063 च्या स्मार्टफोनला काही दिवसांआधी FCC वेबसाइट वर स्पॉट करण्यात आले होते. या लिस्टिंगमध्ये फोनच्या एका स्केचला शेयर करण्यात आले होते. स्केचच्या आधारावर म्हटले जात आहे की फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत येवू शकतो. फोनचा कॅमेरा सेटअप स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूलच्या आतमध्ये देण्यात आला आहे. फोनमध्ये 4,880mAh च्या रियल कॅपिसिटीसोबत 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34kLc6X

Comments

clue frame