Poco M3 इंडियन व्हेरियंट लवकरच लाँच होणार, 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा मिळणार

नवी दिल्लीः पोको कंपनी लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन इंडियन व्हेरियंट लवकरच लाँच करणार आहे. कंपनीने ब्लॅक फ्रायडे सेल आधी या फोनला ग्लोबली लाँच केले होते. आता कंपनीच्या या फोनला TUV Rheinland सर्टिफिकेशन मिळाले आहे. पोको एम ३च्या इंडियन एडिशनचे मॉडल नंबर M2010J19CI आहे. पोकोच्या या फोनमध्ये बहुतांश फीचर्स हे रेडमी नोट ४जी सारखे आहेत. या दोन्ही फोनचा कॅमेरा आणि बॅक पॅनेल मध्ये थोडा फरक आहे. वाचाः वाचाः Poco M3 चे खास वैशिष्ट्ये फोनमध्ये ६.५३ इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत येतो. ६ जीबी रॅम पर्यंत LPDDR 4x RAM आणि 128जीबी च्या यूएफएस 2.2 स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर दिला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने येणारा हा फोन अँड्रॉयड १० ओएसवर काम करतो. वाचाः वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला तीन रियर कॅमेरे मिळू शकतील. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh बॅटरी दिली जाणार आहे. ही बॅटरी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. चीनमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत १२९ डॉलर (९ हजार ४०० रुयपे) किंमत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38c7RDW

Comments

clue frame