शाओमीचा Mi QLED TV 4K भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः Xiaomi ने भारताता आपला ला लाँच केले आहे. ही टीव्ही 55 इंचाचा असून यात QLED Ultra-HD स्क्रीन दिली आहे. कंपनीने या टीव्हीची किंमत ५४ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. हा भारतात लाँच होणारा पहिला QLED TV आहे. हा अँड्रॉयड टीव्ही आहे. या टीव्हीचा सेल २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवरून सुरू करण्यात येणार आहे. तसेच या टीव्हीला mi.com, mi होम स्टोर्स वरून सुद्धा ऑर्डर केले जावू शकते. वाचाः Mi QLED TV 4K चे खास वैशिष्ट्ये टीव्हीत 3840x2160 पिक्सल रेजॉलूशन सोबत ५५ इंचाचा अल्ट्रा एचडी स्क्रीन दिली आहे. हे डॉल्बी व्हिजन सोबत अनेक एचडीआर फॉरमेट्सला सपोर्ट करते. ओएस मध्ये टीव्ही अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. वाचाः शाओमीच्या या प्रीमियम टीव्हीत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. टीव्हीत मीडियाटेक MT9611 क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. दमदार साउंडसाठी या टीव्हीत ६ स्पीकर सिस्टम सोबत ३० वॉटचे ऑडियो आउटपूट मिळतो. टीव्हीत चार फुल रेंज ड्रायवर आणि दोन ट्विटर उपलब्ध आहे. वाचाः शाओमीचा हा टीव्ही QLED टीवी बिल्ट-इन क्रोमकास्ट सोबत येतो. कनेक्टिविटीसाठी या टीव्हीत तीन HDMI पोर्ट सोबत दोन यूएसबी पोर्ट दिले आहे. तसेच यात व्हर्जन ५.० सुद्धा मिळणार आहे. टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ६० Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येते. वाचाः शाओमीचा दुसरा टीव्ही प्रमाणे यात पेचवॉल लाँचर वर काम करतो. या टीव्हीत लेटेस्ट पेचवॉल ३.५ दिले आहे. टीव्हीचा रिमोट आधीच्या Mi TV मॉडल्ससारखाच आहे.यात काही बटन्स शिवाय प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म्स साठी हॉटकीज दिली आहे. टीव्हीत व्हाइस कमांड सपोर्ट साठी गुगल असिस्टेंट मिळतो. वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mqInYp

Comments

clue frame