नवी दिल्लीः रिलायन्स जिओ सह अन्य कंपन्यांनी आपल्या युजर्संसाठी कमी किंमतीत बेस्ट प्लान ऑफर केले आहे. सध्या लाँग टर्म वैधताचे प्लान ग्राहकांना पसंत पडत आहेत. मोठी वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना वारंवार मोबाइल रिचार्ज करण्याच्या समस्येतून सुटका मिळते. रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलच्या एका वर्षाच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानसंबंधी जाणून घ्या. या प्लानमध्ये युजर्संना रोज डेटा, फ्री कॉलिंग, एसएमएस सुविधा आणि अन्य काही बेनिफिट्सची सुविधा मिळते. वाचाः रिलायन्स जिओचा १२९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. प्लानमध्ये युजर्संना एकूण २४ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी युजर्संना १२ हजार नॉन एफयूव्ही मिनिट्स मिळते. ३६०० फ्री एसएमएस ऑफर केले जातात. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन कंपनी देते. वाचाः एअरटेलचा १४९८ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. इंटरनेट साठी कंपनी युजर्संना या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा देते. ३६०० फ्री एसएमएस देते. एअरटेल एक्स्ट्रीम अॅप प्रीमियम, विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्सन सोबत फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक देते. वाचाः वोडाफोन आयडियाचा १४९९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडियाचा हा प्लान एअरटेलच्या १४९८ रुपयांच्या प्लानसारखा आहे. या प्लानमध्ये कंपनी एकूण २४ जीबी डेटा सोबत ३६५ दिवसांची वैधता ऑफर करते. ३६०० फ्री एसएमएस सोबत या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी देशभर फ्री कॉलिंग देते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3puEa8b
Comments
Post a Comment