नवी दिल्लीः फेस्टिवल सीजन संपला असला तरी काही मनपसंत फोनवर अद्यापही जबरदस्त डिस्काउंट आणि ऑफर्स दिली जात आहे. यात Reliance Digital ने , आणि यासारख्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर ६ हजार रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही HDFC Bank च्या कार्ड्सचा वापर केला तर तुम्हाला आयफोनवर डिस्काउंट आणि ऑफर्सचा फायदा मिळू शकतो. वाचाः iPhone 12 वर इतकी सूट रिलायन्स डिजिटलवर सुरू असलेल्या या ऑफरमध्ये आयफोन १२ वर तुम्हाला ६ हजार रुपयांची सूट मिळू शकते. आयफोन १२ ची किंमत ७९ हजार ९९० रुपये आहे. या सूटनंतर हा फोन तुम्हाला ७३ हजार ९९० रुपयांत मिळू शकतो. या फोनवर मिळणारी ही बेस्ट डील आहे. अॅपलने दोन महिन्यापूर्वी आयफोन १२ सीरीजचा स्मार्टफोन लाँच केले होते. आयफोन १२ मध्ये ओलेड डिस्प्ले दिला आहे. यात oleophobic coating आहे. हा फोन ५जी असून यात अॅपलचा A14 Bionic प्रोसेसर दिला आहे. हा iOS 14 वर काम करतो. यात १२ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सोबत १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः iPhone 11 रिलायन्स डिजिटलवर आयफोन ११ वर तुम्हाला ५ हजारांचा कॅशबॅक सोबत खरेदी करता येवू शकतो. आयफओन ११ ची किंमत सध्या ५४ हजार ९९० रुपये आहे. या डिस्काउंटनंतर हा फोन तुम्हाला ४९ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ६.१ इंचाचा Liquid Retina डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये A14 Bionic प्रोसेसर दिला आहे. हा फोन वॉटर आणि डस्ट रिसिस्टेंट आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः iPhone SE अॅपलचा मिड रेंज मध्ये असलेला फोन iPhone SE वर रिलायन्स डिजिटल मध्ये ४ हजारांचा कॅशबॅक सोबत खरेदी करता येवू शकतो. हा फोन सूटनंतर ३५ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या फोनमध्ये ४.७ इंचाचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा फोन वॉटर प्रूप आहे. यात A13 Bionic प्रोसेसर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WzF3zC
Comments
Post a Comment