नवी दिल्लीः इनफिनिक्सने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक एन्ट्री लेवल स्मार्टफोन असून याची किंमत ५ हजार ९९९ रुपये आहे. या फोनचा सेल २४ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात येणार आहे. जाणून घ्या या फोनसंबंधी. वाचाः फोनचे खास फीचर्स फोनमध्ये ६.१ इंचाचा एचडी प्लस ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. फोनचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ८५ टक्के आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए २० क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियरमध्ये एलईडी फ्लॅश सोबत एक ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा AI डिटेक्शन मोड सोबत येतो. जबरदस्त फोटोग्राफीसाठी फोनमध्ये AI HDR मोड, AI ब्यूटी मोड आणि पोर्ट्रेट मोड यासारखे ऑप्शन दिले आहेत. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला ड्यूल एलईडी फ्लॅश सोबत ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक यासारखे जबरदस्त फीचर या फोनमध्ये दिले असून फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी ३५ दिवसांची स्टँडबाय टाइम सोबत येते. फोनला कंपनीने तीन कलर टोपाज ब्लू, क्वॉर्ट्ज ग्रीन आणि ऑब्सीडियन ब्लॅक मध्ये लाँच केले आहे. वाचाः SNOKOR A10 साउंडबार सुद्धा लाँच फोनसोबत इनफिनिक्सने आज आपला साउंडबार सुद्धा लाँच केला आहे. २.५ इंचाचा एलईडी डिस्प्ले सोबत या साउंड बारची किंमत ४४९९ रुपये आहे. दमदार साउंड आउटपूट साठी यात ६० वॉट आउटपूटचा ऑल फ्रीक्वेंसी स्पीकर देण्यात आला आहे. ब्लूटूथ ५.० च्या या साउंडबार मध्ये कनेक्टिविटीसाठी अनेक ऑप्शन दिले आहे. या साउंडबारचा सेल १८ डिसेंबर रोजी फ्लिपकार्टवरून सुरू होणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37nt8Lo
Comments
Post a Comment