Happy New Year 2021: विना अॅप डाउनलोड WhatsApp वर 'असे' पाठवा नवीन वर्षाचे स्टीकर्स

नवी दिल्लीः २०२० वर्ष सरून आता नवीन वर्ष २०२१ सुरू होणार आहे. इतिहासात २०२० हे वर्ष असे आहे. ज्याला लोक कंटाळले असून नवीन वर्षाची आतुरतने वाट पाहत आहेत. करोनामुळे हे वर्ष जवळपास सर्वांनाच नुकसानकारक ठरले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकांनी जोरदार तयारी केली आहे. नवीन आशा, नवीन आनंद, नवीन लक्ष्य, या सर्वांच्या स्वागतासाठी लोकांमध्ये फार उत्सूकता पाहायला मिळत आहे. वाचाः नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण आपल्या मित्रांना, कुटुंबातील व्यक्तींना, नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवतील. दरवर्षी असंख्य जण व्हॉट्सअॅपवरून आपल्या जवळच्या व्यक्तींना नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत असतात. व्हॉट्सअॅपवर मल्टिमीडिया मेसेज किंवा शुभेच्छा पाठवणे सोपे आहे. जेव्हापासून व्हॉट्सअॅपमध्ये स्टिकरचा सपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रंगात व वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा पाठवणे आणखी आनंददायी झाले आहे. वाचाः >> नवीन वर्षाचे स्वागत करताना काही कमी राहू नये, यासाठी डेव्हलपर्स बरीच मेहनत घेतली आहे. व्हॉट्सअॅपवर खास हॅप्पी न्यू ईयर २०२१ स्टीकर्स ( Sticker) पाठवण्यासंबंधी आम्ही तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत आहोत. व्हॉट्सअॅपवरून स्टिकर पाठवण्यासाठी कोणताही वेगळा अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. जाणून घ्या डिटेल्स. >> सर्वात आधी सोपी पद्धत पाहा. व्हॉट्सअ्ॅपला ओपन करा. मेसेजच्या राइटसाइडला दिसत असलेल्या स्टिकर आयकॉनवर क्लिक करा. >> क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टिकरचा पर्याय सोबत एक जिफ चे बटन दिसेल. याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग लिस्टमध्ये Happy New Year 2021 च्या जिफ दिसेल. जर दिसत नसतील तर तुम्ही Happy New Year 2021 लिहून फाइल सर्च करू शकता. >> दुसरी पद्धत जाणून घ्या. सर्वात आधी व्हॉट्सअॅपला ओपन करा. यानंतर इमोजी आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर स्टिकर पर्यायावर क्लिक करा. >> आता डाव्या बाजुला दिसत असलेल्या प्लस चिन्हावर क्लिक करा. त्याला स्क्रॉल करून खाली आणा. आता तुम्हाला गेट मोर स्टिकर्सचा पर्याय मिळेल. >> गेट मोर स्टिकर्स वर क्लिक केल्यानंतर थेट गुगल प्ले स्टोरवर जा. आता या ठिकाणी हॅप्पी न्यू ईयर २०२१ स्टिकर्स सर्च करा आणि डाउनलोड करा. >> यानंतर समोर दिसत असलेल्या स्टिकर्सला ज्याला प्लस चिन्हावर क्लिक करून त्याला स्टिकर मध्ये अॅड करा. यानंतर व्हॉट्सअॅपच्या स्टिकरवर जा. त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे हॅप्पी न्यू इयर २०२१ चे स्टिकर्स मिळतील. त्यातील तुमच्या पसंतीचे तुम्ही तुमच्या आवड्यात व्यक्तींना पाठवू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38167hO

Comments

clue frame