BSNLच्या या प्लानमध्ये मिळतोय ७० जीबी डेटा, किंमत ३०० रु. पेक्षा कमी

नवी दिल्लीः सर्वात स्वस्त डेटा प्लान देणाऱ्यात बीएसएनएल अन्य कंपन्यांच्या पुढे आहे. खासगी कंपनीला जबरदस्त टक्कर देणाऱ्या बीएसएनएलने आणखी एक नवीन वर्क फ्रॉम होम प्रीपेड प्लान बाजारात उतरवला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ७० जीबी हाय स्पीड डेटा दिला जात आहे. जाणून घ्या या बीएसएनएलच्या नवीन प्लानसंबंधी. वाचाः BSNLचा हा प्लान सर्वसाधारणे अशा लोकांसाठी आणला गेला आहे जे लोक अजूनही वर्क फ्रॉम होम करीत आहेत. या प्लानची किंमत २५१ रुपये आहे. या प्लानमध्ये केवळ डेटा मिळतो. यात तुम्हाला ७० जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये कोणत्याही प्रकारची कॉलिंग आणि एसएमएस सेवा मिळत नाही. हा प्लान केवळ डेटा साठी ओळखला जातो. वाचाः १५१ रुपयांच्या प्लानमध्ये ४० जीबी डेटा BSNL कडे आणखी एक १५१ रुपयांचा एसटीव्ही आहे. ज्यात ४० जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता सुद्धा २८ दिवसांची आहे. हा एक डेटा प्लान आहे. या महिन्याच्या सुरुवातीला BSNL ने एसटीव्ही सोबत झिंग म्यूझिक अॅप चे फ्री सब्सक्रिप्शन देणे सुरू केले आहे. वाचाः जिओकडे तीन वर्क फ्रॉम होम प्लान खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे वर्क फ्रॉम होम प्लानचे तीन प्लान आहेत. १५१ रुपये, २०१ रुपये, आणि २५१ रुपयांचे तीन प्लान असून या प्लानमध्ये अनुक्रमे ३० जीबी, ४० जीबी आणि ५० जीबी डेटा मिळते. जर तुम्हाला जिओ आणि BSNL चे २५१ रुपयांच्या प्लानची तुलना करायची असेल तर बीएसएनएल २० जीबी अतिरिक्त देते. परंतु, यात एक खास बाब म्हणजे जिओकडे ४ जी डेटा आहे तर BSNL कडे ३ जी डेटा उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WqThmu

Comments

clue frame