शाओमीच्या 'या' फोनसोबत बॉक्समध्ये नाही मिळणार 'चार्जर'

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमी आपल्या फ्लॅगशीप फोन सोबत बॉक्समध्ये चार्जर देणार नाही. याआधी अनेक रिपोर्ट्समधून माहिती समोर आली होती की, सॅमसंग कंपनी आपल्या फ्लॅगशीप Galaxy S21 सीरीज सोबत चार्जर देणार नाही. वाचाः शाओमीची सीरीज लाँच करण्यात येणार आहे. रिटेल बॉक्सच्या लीक फोटोनुसार, कंपनी आपल्या प्रीमियम फोन सोबत चार्जर देणार नाही. शाओमी २८ डिसेंबर रोजी आपली फ्लॅगशीप सीरीज एमआय ११ लाँच करणार आहे. लीक फोटोत अॅपल आयफोन १२ बॉक्सची तुलना करण्यात आली आहे. यात थोडा फरक उघड केला आहे. शाओमी मी ११ चा बॉक्स अॅपलच्या बॉक्स पेक्षा थोडा मोठा आहे. वाचाः अॅपल आयफोन १२ सोबत कंपनी चार्जर देणार नाही. यानंतर शाओमी आणि सॅमसंग ने सोशल मीडियावर अॅपलची खिल्ली उडवली होती. परंतु, आता सॅमसंगने आपल्या या पोस्टला सोशल मीडियावरून डिलीट केले आहे. ज्यात लेटेस्ट आयफोन १२ सीरीज सोबत चार्जर न देण्याची खिल्ली उडवली होती. यानंतर वेगाने अशी माहिती समोर आली होती की, गॅलेक्सी एस २१ सीरीज सोबत चार्जर देणार नाही. वाचाः अॅपलने म्हटले होते की, कंपनी आगामी आयफोन्ससोबत बंडल पॉवर अडेप्टर देणार नाही. अॅपलच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे कार्बन इमिसन कमी होईल. पुढील काही वर्षात कार्बन फ्री कंपनी कंपनी बनवणे हे कंपनीचे ध्येय आहे. पॉवर अडेप्टर शिवाय अॅपल आयफोन १२ सोबत ईयरफोन सुद्धा फ्री देत नाही. वाचाः एम११ च्या लाँचिंग आधी शाओमीच्या या फ्लॅगशीप सीरीजवरून खूप माहिती समोर आली आहे. या सीरीजमध्ये लेटेस्ट कॉर्निंग गोरिला ग्लास ७ किंवा कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस दिला जाणार आहे. आतापर्यंत कॉर्निंग गोरिला ग्लास विक्सटला केवळ गॅलेक्सी नोट २० लाइन अप मध्ये ऑफर करण्यात आले आहे. एका अधिकृत टीजरमध्ये लाइट व्हिडिओ शूटिंग साठी देण्यात येणाऱ्या स्पेशल मोड (नाइट मोड) ला दाखवण्यात आले आहे. या सीरीजमध्ये टॉप एन्ड क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिला जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aJtdeM

Comments

clue frame