नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने भारतात आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. आणि असे या दोन स्मार्टफोनचे नावे आहेत. सॅमसंगने याआधी गॅलेक्सी ए३१ च्या किंमतीत सुद्धा कपात केली आहे. माय स्मार्ट प्राइसच्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. Galaxy M01 आणि Galaxy M01s आता स्वस्त किंमतीत खरेदी करता येवू शकेल. वाचाः स्मार्टफोनच्या किंमती सॅमसंग गॅलेक्सी एस ०१ च्या किंमतीत ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच आता हा फोन ७ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. याआधी या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये होती. तर गॅलेक्सी एस०१ हँडसेटमध्ये सुद्धा ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता या फोनला ९ हजार ४९९ रुपयांऐवजी ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. वाचाः फोनचे वैशिष्ट्ये सॅमसंग गॅलेक्सी एम०१ स्मार्टफोनमध्ये ५.७१ इंचाचा एचडी प्लस टीएफटी इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर, ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. हँडसेटमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी व २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला आहे. फोनमध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर चालतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी एम ०१ एस फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस टीएफटी इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. हँडसेट मीडियाटेक हीलियो पी २२ चीपसेट, ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा व २ मेगापिक्सलचा सेन्सरचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये पॉवरसाठी 4000mAh बॅटरी दिली आहे. हँडसेट अँड्रॉयड १० वर चालतो. फोनमध्ये रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. याशिवाय या फोनमध्ये डॉल्बी एटमॉस टेक्नोलॉजी सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n2eiia
Comments
Post a Comment