वोडाफोन-आयडियाची भन्नाट ऑफर, ५० जीबी डेटा मिळतोय 'फ्री'

नवी दिल्लीः जर तुम्ही वोडाफोन-आयडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी ५० जीबी डेटा अतिरिक्त देण्याची घोषणा केली आहे. हा अतिरिक्त डेटा सर्व युजर्ससाठी नाही. तर ज्या युजर्संनी १४९९ रुपयांचा प्री पेड प्लान आहे. त्यांना ही ऑफर मिळणार आहे. वाचाः वोडाफोन-आयडियाच्या १४९९ रुपयांच्या प्लानचे फायदे वोडाफोन-आयडियाचे १४९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा मिळतो. परंतु, या ऑफर अंतर्गत एकूण ७४ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना ३६५ दिवसांची वैधतेसोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच ३६०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. या प्लानमध्ये वोडाफोन मूव्हीज आणि टीव्ही अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला वोडाफोन मूव्हीज आणि टीव्ही अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. हा ५० जीबी अतिरिक्त डेटा काही निवडक युजर्संना मिळत आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना मेसेज करून याची माहिती देत आहे. वोडाफोन आयडियाने या ऑफरला एक्स्ट्रा डेटा ऑफर असे नाव दिले आहे. वाचाः वोडाफोन-आयडियाने लाँच केला डिजिटल एक्सक्लूसिव प्लान वोडाफोन आयडियाने नुकताच ३९९ रुपयांचा डिजिटल एक्सक्लूसिव नावाने प्रीपेड प्लान लाँच केला आहे. ही सेवा अशा युजर्ससाठी आहे. जे ऑनलाइन सीम कार्ड ऑर्डर करतात. नवीन सिमकार्ड सोबत हा प्लान अन्य कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहे. वाचाः जर तुमच्याकडे ३९९ रुपयांचा प्लान सोबत कंपनीच्या वेबसाइटवरून सिम कार्ड ऑर्डर करीत असाल तर या प्लानमध्ये तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37X8i61

Comments

clue frame