नवी दिल्लीः स्मार्टफोन नवीन वर्षात ११ जानेवारी रोजी लाँच होणार आहे. या फोनला अवघे काही दिवस उरले असताना या फोनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दरम्यान कंपनीने कन्फर्म केले आहे की, या फोनमध्ये १२० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या चार्जिंग टेक्नोलॉजीच्या मदतीने हा फोन केवळ १५ मिनिटात फुल चार्ज करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. वाचाः फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर मिळणार हा फोन चीनमध्ये ११ जानेवारी रोजी सायंकाळी साडे सात वाजता लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने या फोनच्या BMW एडिशनचे डिझाइन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवरून फोनच्या रियर डिझाइनची माहिती उघड झाली आहे. पोस्टर पाहिल्यानंतर दिसत आहे की, फोनला तीन रियर फेसिंग कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनच्या कॅमेरा ट्राइंगल डिझाइन दिली आहे. स्पेशल बीएमडब्ल्यू एडिशनमध्ये व्हाइट रियरसोबत ब्लॅक, रेड आणि ब्लू स्ट्रिप दिली आहे. वाचाः १२ जीबी रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेट या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत स्नॅपड्रॅगन ८८८ ५जी प्रोसेसर दिला जावू शकतो. स्क्रीन फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि १२९ हर्ट्जचा रिफ्रेश रेट सोबत येईल. याशिवाय, फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळण्याची अपेक्षा आहे. वाचाः ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा डिजिटल चॅट स्टेशनच्या एका रिपोर्टनुसार, फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 4000mAh बॅटरी दिली जाणार आहे. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n5LB3M
Comments
Post a Comment