नवी दिल्लीः बेस्ट स्मार्ट वॉच खरेदी करायची असेल तर आता यासाठी जास्त पैसे मोजण्याची गरज नाही. स्वस्त किंमतीत सुद्धा अनेक स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेत. मार्केटमध्ये स्मार्ट वॉच आणि फिटनेस ब्रँड मोठ्या प्रमाणात लाँच करण्यात येत आहेत. सध्या अॅपल किंवा सॅमसंग पासून अन्य मोठ्या कंपन्यांच्या महाग स्मार्ट वॉच आहेत. परंतु, अन्य दुसऱ्या कंपन्यांच्या स्वस्त किंमतीच्या वॉच असून याची किंमत ३ हजारांपेक्षा कमी आहे. वाचाः Realme Watch या स्मार्टवॉचला ऑनलाइन रिटेल स्टोर्सवरून ऑफरमध्ये खरेदी करण्यासाठी ३ हजार रुपये मोजावे लागतात. या स्मार्ट वॉचचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ऑक्सिजन लेवल मॉनिटर मिळते. जे महागड्या स्मार्टवॉचमध्ये मिळते. याशिवाय हार्ट रेट मॉनिटर, फिटनेस मोड पासून अनेक फीचर्स मिळते. वाचाः Amazfit Neo Smart Watch स्मार्ट वॉच आणि फिटनेस बँड साठी ही कंपनी ओळखली जाते. कंपनीच्या स्मार्ट वॉचला ३ हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी खरता येवू शकते. हे मॉडल नवीन आहे. रेट्रो डिझाइनचे आहे. याची बॅटरी बॅकअप २८ दिवसांपर्यंत आहे. ब्लॅक अँड व्हाइट डिस्प्ले आहे. परंतु, स्मार्ट वॉचचे सर्व फीचर्स यात आहेत. वॉटर प्रूफ आहे. ऑलवेज ऑन डिस्प्ले आहे. हार्ट रेट मॉनिटर आहे, स्लीप मॉनिटर आहे. फोनने कनेक्ट करून मेसेज आणि ईमेल पाहू शकता. वाचाः Noise colorfit Pro या स्मार्ट वॉचची डिझाइन अॅपल वॉचसारखी आहे. यात १.३ इंचाची कलर डिस्प्ले आहे. ही फुल टच स्क्रीन आहे. यात फिटनेसच्या अनेक मोड्स मिळतात. या वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग सिस्टम आहे. जे रियल टाइम हार्ट रेट मॉनिटर करतात. कंपनीचा दावा आहे की, १० दिवसांपर्यंत बॅटरी बॅक अप देवू शकते. या स्मार्ट वॉचला ३ हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येवू शकते. वाचाः Gionee Smart life या स्मार्ट वॉचला सुद्धा ३ हजार रुपयांच्या कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते. यात कॅलरी मीटर, हार्ट रेट मॉनिटर आणि टच स्क्रीन सारखे फीचर्स दिले आहेत. ही वॉटर प्रूफ आहे. यात फीटनेस संबंधी अनेक मोड्स जोडलेले आहेत. या वॉचचा डायल स्टेनलेस स्टील दिला आहे. वाचाः Amazfit Bip या सेगमेंटमध्ये ही स्मार्टवॉच जबरदस्त वॉचपैकी एक आहे. या स्मार्ट वॉचला सिंगल चार्ज करून एक महिन्यांपर्यंत चालवू शकता येते. यात ऑलवेज ऑन डिस्प्ले दिला आहे. वॉटर रेजिस्टेंट आहे. फोनच्या नोटिफिकेशन्स दिसतील. यात वॉच टच स्क्रीन आहे. यात हार्ट रेट मॉनिटर सह अन्य सॉफ्टवेयर बेस्ड फिटनेस मोड्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mTljSo
Comments
Post a Comment