नवी दिल्लीः Google वर सध्या लाखोच्या संख्येत अॅप्स आहेत. या अॅप्समध्ये अनेक अॅप्स हे फ्री आहेत. तसेच काही अॅप्ससाठी पैसे मोजावे लागतात. पैशांशिवाय हे अॅप्स डाउनलोड करता येवू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी अशा अॅप्ससंबंधी माहिती देत आहोत. जे अॅप्स खरेदी केल्यानंतर सजण्यास अवघड जातात. त्या अॅप्ससाठी मोजलेले पैसे तुम्ही परत मिळवू शकतात. यासाठी गुगल पॉलिसी सुद्धा वाचणे गरजेचे आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः गुगल पॉलिसी आधी वाचून घ्या गुगलने रिफंड पॉलिसी आपल्या वेबसाइटवर दिली आहे. जर रिफंड गुगलला मंजूर केलेली असेल तर तीन किंवा पाच दिवसांच्या आत तुम्हाला तुमचा रिफंड मिळू शकतो. परंतु, काही वेळा खरेदी केलेला माल परत केला जावू शकत नाही. अचानक पणे आपल्याला माहिती होते की, अॅपसाठी एक निर्धारित रक्कम देवून आपण तो अॅप खरेदी केलेला आहे. हे कधी तरी आपल्याकडून चुकून होत असते. वाचाः ४८ तासांचा अवधी अॅपसाठी पैसे परत करण्याची जास्तीत जास्त अवधी हा ४८ तासांचा आहे. जर तुम्ही तुमच्या कार्ड किंवा अकाउंटवरून चुकून एखाद्या अॅप्सची खरेदी केली असेल तर त्यासाठी तुम्ही गुगलवरून ६५ दिवसांपर्यंत पैसे परत करण्याची मागणी करू शकता. जर तुम्ही एखादा अॅप डाउनलोड केल्यानंतर दोन तासांहून जास्त वेळ झाला असेल तर ही मागणी करू शकता. अॅप परत करण्यासाठी एक ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. गुगल अकाउंटवर लॉगिन केल्यानंतर हा फॉर्म मिळतो. आपल्या गुगल प्ले स्टोरवरच्या अकाउंटमध्ये जावून ऑर्डर हिस्ट्री पाहा. त्या ठिकाणी खरेदीची सर्व माहिती तुम्हाला दिसेल. ज्या अॅपला परत करायचे आहे. त्यासोबत रिफंड वर क्लिक करून पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37Toi9a
Comments
Post a Comment