नवी दिल्लीः २०२० या वर्षात अनेक नवीन लाँच करण्यात आले आहेत. या वर्षी अनेक कंपन्यांनी स्वस्त तसेच एन्ट्री स्मार्टफोन लाँच केले आहेत. एन्ट्री लेवल सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढल्याने कंपन्यांनी कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स ऑफर करणारे स्मार्टफोन लाँच केले आहेत. जाणून घ्या या फोनसंबंधी. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी M01 कोर सॅमसंगच्या या जबरदस्त एन्ट्री लेवल स्मार्टफोनची किंमत ५ हजार ४९० रुपये आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत मीडियाटेक MT6739WW क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ५.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः लावा Z61 प्रो लावाचा हा स्मार्टफोन भारतात जुलै महिन्यात लाँच करण्यात आला होता. २ जीबी रॅम प्लस १६ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनची किंमत फ्लिपकार्टवर ५ हजार ७७७ रुपये आहे. फोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिलाआहे. Unisoc ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करणाऱ्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियर मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3100mAh बॅटरी दिली आहे. वाचाः इंन्फीनिक्स स्मार्ट HD 2021 इनफिनिक्सचा हा एन्ट्री लेवल स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आला आहे. याची किंमत ५ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो A20 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६.१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rv439r
Comments
Post a Comment