अॅमेझॉनवर २२ डिसेंबर पासून सेल, 'या' स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर येत्या २२ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. हा सेल २५ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. अॅमेझॉन सेलमध्ये प्रसिद्ध ब्रँड्स सॅमसंग, शाओमी, वनप्लस आणि अॅपलच्या फोन्सवर तसेच अॅक्सेसरीजवर ४० टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज बोनस आणि एचडीएफसी बँक कार्ड व ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे फोन खरेदी वर १५०० रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. या फेस्टमध्ये , , Samsung Galaxy M21, OnePlus Nord, Redmi 9 Prime, OnePlus 8T सह अन्य फोन्सवर डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः स्मार्टफोनशिवाय अॅमेझॉन फॅब फेस्ट मध्ये अॅक्सेसरीज जसे पॉवर बँक, केस आणि कवर, चार्जर, व केबल आणि हेडसेट वर सूट दिली जाणार आहे. अॅमेझॉनरवर या सर्व अॅक्सेसरीजला १०० रुपयांपेक्षा कमी किमतींच्या सुरुवाती सोबत खरेदी करता येवू शकते. वाचाः आयफोन ११ ला अॅमेझॉन सेलमध्ये ५१ हजार ९९९ रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ६.१ इंचाचा लिक्विड रेटिना एचडी एलसीडी डिस्प्ले, ए१३ बायोनिक प्रोसेसर व ड्यूल कॅमेरा सिस्टम यासारखे फीचर्स दिले आहेत. वनप्लस नॉर्ड ५जी ला २८ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. एचडीएफसी बँक ऑफर सोबत १ हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. रेडमी ९ प्राईमला १० हजार ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात येणार आहे. या हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये 5020mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वाचाः आयफोन ७ ला २३ हजार ९९० रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ४.७ इंचाचा रेटिना एचडी एलसीडी डिस्प्ले, १२ मेगापिक्सलचा वाइड कॅमेरा आणि ए १० फ्यूजन चिपसेट दिला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम ५१ ला २१ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे. वनप्लस 8T 5G ला ४० हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. एचडीएफसी बँक ऑफर सोबत २ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत क्व़ॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः रेडमी नोट ९ प्रोला १२ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनला एक्सचेंज केल्यास १ हजारांची अतिरिक्त सूट मिळू शकते. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम ३१ एसला १८ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. ओप्पो ए १२ ला ९९९० रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस वॉटरड्रॉप स्क्रीन दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p9yzDL

Comments

clue frame