Best of 2020: यावर्षी 8GB रॅमच्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनचा जलवा

नवी दिल्लीः पॉवरफुल फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्सची क्रेज वेगाने वाढत आहे. त्यामुळे ४ जीबी रॅमच्या तुलनेत ८ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची जास्त मागणी वाढत आहे. ८ जीबी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये गेमिंग आणि मल्टी टास्किंगचा अनुभव खूप जबरदस्त आहे. जाणून घ्या २०२० मध्ये लाँच झालेले ८ जीबी रॅमचे जबरदस्त टॉप ३ स्मार्टफोन्स. ज्याचा वर्षभर जलवा पाहायला मिळाला आहे. वाचाः वनप्लस नॉर्ड वनप्लस नॉर्ड अपर मिड रेंज सेगमेंटमध्ये येणारा हा एकमेव पॉवरफुल स्मार्टफोन आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत अॅमेझॉनवर २७ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६.४४ इंचाचा फ्लूइड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर वर काम करणाऱ्या या फोनमध्ये 4115mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी M51 सॅमसंगचा हा स्मार्टफोन गेमिंग आणि मल्टी टास्किंग साठी जबरदस्त आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 7000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः गेमिंगच्या चाहत्यांसाठी हा एक आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज च्या या फोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५९ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला २४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर दिला आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38uqSBB

Comments

clue frame