6GB रॅमसोबत Oppo A53 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः ओप्पोने मार्केटमध्ये नवीन आपला स्मार्टफोन लाँच केला आहे. ओप्पोच्या प्रसिद्ध ए सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आला असून सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन्स पैकी एक असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने या फोनला आता सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. येणाऱ्या काही आठवड्यात भारतासह अन्य देशात लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचाः हा फोन ४ जीबी रॅम आमि ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. फोनच्या ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटची किंमत १२९९ युआन (१४ हजार ६०० रुपये) पर्पल, लेक ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन २१ डिसेंबर पासून डिलिवर केला जाणार आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये फोनमध्ये 2400x1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा एलसीडी पॅनल दिला आहे. डिस्प्ले चे खास वैशिष्ट्ये म्हणजे 90Hz चे रिफ्रेश रेट सोबत येते. फोनचा डिस्प्ले फुल व्ह्यू डिझाइनसोबत तसेच पंच होल सोबत येतो. या फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 720 चिपसेट दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियर तीन एआय कॅमेरे दिले आहे. फोनचा मेन कॅमेरा १६ मेगापिक्सलचा दिला आहे. तसेच २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट स्टाइल कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4040mAh ची बॅटरी दिली आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला नाही. साइड माउंडेट फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ३.५ एमएम हेडफोन जॅक दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r4B642

Comments

clue frame