5,050mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासोबत येतोय नोकियाचा नवा स्मार्टफोन

नवी दिल्लीः एचएमडी ग्लोबल लवकरच एक नवीन स्मार्टफोन आणणार आहे. या फोनची अनेक दिवसांपासून उत्सूकत आहे. आतापर्यंत या फोन्ससंबंधी अनेक डिटेल्स समोर आली आहेत. परंतु, आता या फोनची आणखी दुसरी माहिती समोर आली आहेत. 5,050mAh बॅटरी सोबत हा स्मार्टफोन TUV Rheinland जपानच्या वेबसाइटवर दिसला आहे. याआधी एका सर्टिफिकेशन वेबसाइटवर नोकियाचे तीन मॉडल्स दिसले होते. त्यात एका फोनमध्ये 5050mAh बॅटरी होती. वाचाः Nokia 7.3 मध्ये काय असणार खास रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, नोकिया ७.३ स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९० प्रोसेसर मिळू शकतो. तसेच फोनला ५जी कनेक्टिविटी मिळेल. फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. या लिस्टमध्ये आणखी एक मॉडल Nokia 6.3 याचा उल्लेख होता. या फोनमध्ये 4,470mAh बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. नोकिया ६.३ स्मार्टफोनच्या रियरमध्ये २४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि दोन अन्य सेन्सर मिळू शकतो. नोकिया ७.३ आणि नोकिया ६.३ शिवाय कंपनी प्रीमियम फोन नोकिया १० सुद्धा लाँच करू शकते. वाचाः नोकियाचा नवीन स्मार्टफोन 5,050mAh बॅटरी सोबत येणार असून हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठी बॅटरीचा फोन असणार आहे. या महिन्यात कंपनीने दोन बजेट स्मार्टफोन नोकिया ५.४ आणि नोकिया सी१ प्लस लाँच केले आहेत. दोन्ही फोनला सध्या यूरोपियन बाजारात लाँच केले आहेत. हे फोन इंडियन मार्केटमध्ये कधीपर्यंत लाँच करण्यात येणार यासंबंधी कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38OjAZA

Comments

clue frame