५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्रीपेड 4G डेटा वाउचर

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड व्हाइस कॉल आणि डेटा प्लान शिवाय ४जी डेटा वाउचर्स सुद्धा ऑफर करीत आहे. हे व्हाउचर्स या सब्सक्राइबर्स साठी चांगले असतात. ज्यांना हाय स्पीड डेटा हवा आहे. , , (Vi) आणि आपल्या ग्राहकांना मल्टीपल ४जी डेटा वाउचर ऑफर करते. याची किंमत १ हजारांपर्यंत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी डेटा वाउचर्स संबंधी माहिती देत आहोत. ज्याची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. वाचाः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ४ जी डेटा वाउचर जिओचे ४९९ रुपयांचे रिचार्ज पॅक 'Cricket Pack'नावाने येते. या पॅकमध्ये कंपनी ८४ जीबी डेटा ऑफर करते. याची वैधता ५६ दिवसांची आहे. याशिवाय डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन या डेटा वाउचरमध्ये मिळते. वाचाः याशिवाय कंपनीकडे १५१ रुपये, २०१ रुपये, २५१ रुपयांचे डेटा वाउचर आहे. याला 'Work From Home' वाउचर नाव दिले आहे. २५१ रुपयांच्या वाउचरमध्ये ५० जीबी डेटा, २०१ रुयपात ४० जीबी डेटा आणि १५१ रुपयांत ३० जीबी डेटा ऑफर केला जातो. हे सर्व वाउचर ३० दिवसांच्या वैधतेसोबत येतात. वाचाः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ४जी डेटा वाउचर एअरटेलकडे केवळ दोन ४जी डेटा वाउचर आहेत. याची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. ४८ रुपयांच्या डेटा वाउचरमध्ये ३ जीबी डेटा मिळतो. याची वैधता २८ दिवसांची आहे. ४०१ रुपयांत ३० जीबी डेटा मिळतो. याची वैधता २८ दिवसांची आहे. ४०१ रुपये वाउचरमध्ये ३० जीबी डेटा मिळतो. याची वैधता २८ दिवसाची आहे. ४०१ रुपयांच्या वाउचरमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ४जी डेटा वाउचर वोडाफोन-आयडियाकडे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मल्टीपल डेटा वाउचर्स आहेत. याची किंमत २५१ रुपये, ३५१ रुपये, आणि ३५५ रुपये आहे. २५१ रुपयांच्या डेटा व्हाउचर्समध्ये २८ दिवसांची वैधता आहे. यात ५० जीबी डेटा तर ३५१ रुपयांच्या डेटा वाउचर्समध्ये ५६ दिवसांची वैधता आणि १०० जीबी डेटा ऑफर केला जातो. ३५५ रुपयांच्या डेटा वाउचर्सची वैधता २८ दिवसाची आहे. यात ५० जीबी डेटा मिळतो. तर कंपनी यासोबत १ वर्षासाठी झी ५ प्रीमियम सब्सक्रिप्शन ऑफर करते. वाचाः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ४जी डेटा वाउचर बीएसएनएल ४जी डेटा वाउचर्स Data_WFH_151, DATASTV_197, and Data_WFH_251 आहे. Data_WFH_151 वाउचर मध्ये २८ दिवसांची वैधता मिळते यात ४० जीबी डेटा ऑफर केला जातो. यासोबतच झिंग सब्सक्रिप्शन फ्री मिळते. ‘DATASTV_197’ वाउचर ची वैधता ५४ दिवसांची आहे. यात रोज २ जीबी डेटा मिळतो. यासोबतच फ्री कॉलरट्यून सर्विस मिळते. ‘Data_WFH_251’ वाउचरमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. ७० जीबी डेटा मिळतो. तसेच झिंग सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Kx4gbP

Comments

clue frame