4G डाउनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओची पुन्हा बाजी, 'या' कंपन्यांना मागे टाकले

नवी दिल्लीः रिलायन्स जिओने पुन्हा एकदा ४ जी डाउनलोड स्पीडमध्ये बाजी मारली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारी समोर आली आहे. यात जिओची डाउनलोड स्पीड सरासरी २०.८ एमबीपीएस नोंदली गेली आहे. ही स्पीड ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत ३.० एमबीपीएस जास्त आहे. ऑक्टोबर महिन्यात जिओची ५ जी स्पीड १७.८ एमबीपीएस होती. वाचाः ट्रायच्या माहितीनुसार, नोव्हेंबर मध्ये भारती एअरटेलच्या प्रदर्शनात थोडी सुधारणा पाहायला मिळाली आहे. एअरटेलची साधारण सरासरी ४ जी डाउनलोड स्पीड ऑक्टोबरच्या ७.५ एमबीपीएसच्या तुलनेत नोव्हेंबर मध्ये ८ एमबीपीएस राहिली आहे. आता वोडाफोन आणि आयडिया सेल्यूलर ने एकत्रित काम केले असले तरी ट्राय मात्र या दोन्ही कंपन्यांचे आकडे वेगवेगळे दाखवले आहे. वाचाः वोडाफोन आयडिया नेटवर्कच्या ४ जी डाउनलोड स्पीड मध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत थोड अंतर पाहायला मिळाले आहे. वोडाफोनची स्पीड सुधारली गेली आहे. नोव्हेंबर मध्ये ९.८ एमबीपीएस झाली आहे. तर आयडियाची स्पीड कमी होवून ८.८ एमबीपीएस वर गेली आहे. वोडाफोन आयडिया दोन्हींची स्पीड नोव्हेंबर महिन्यात एअरेटल पेक्षा थोडी जास्त आहे. नोव्हेंबर मध्ये ६.५ एमबीपीएस सोबत वोडाफोनची सरासरी ४ जी अपलोड स्पीड सर्वात वर राहिली आहे. दुसऱ्या नंबरवर आयडिया राहिली आहे. त्याची अपलोड स्पीड ५.८ एमबीएस राहिली आहे. तर रिलायन्स जिओ आणि एअरटेलची नोव्हेंबर महिन्यात सरासरी अपलोड स्पीड अनुक्रमे ३.७ आणि ४ एमबीएस नोंद गेली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ajSR9B

Comments

clue frame