मस्तच! WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करा, या सोप्या टिप्स पाहा

नवी दिल्लीः जर तुम्हाला कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्या शुभेच्छा शेड्यूल करू शकता येतील. कारण, आता थर्ड पार्टी अॅप SKEDit चा योग्य वापर केला तर सोप्या पद्धतीने मेसेज शेड्यूल करता येवू शकते. जर तुमच्या कुण्या मित्राला बरोबर १२ वाजता मेसेज पाठवायचा असेल त्यावेळी तुम्ही झोपेत असता. त्यामुळे १२ वाजेपर्यंत जागे राहण्याची गरज नाही तुम्ही मेसेज शेड्यूल करू शकता. वाचाः सध्या मेसेज शेड्यूल करणे सोपे झाले आहे. फेसबुक असो की जीमेल. किंवा अन्य सोशल मीडिया असो. त्यावर मेसेज शेड्यूल करता येवू शकते. पोस्टमध्ये शेड्यूल करू शकतो. शेड्यूल केलेल्या वेळेला पोस्ट डिलिवर होत असते. आज आम्ही तुम्हाला अँड्रॉयड फोन्स आणि आयफोन्स मध्ये व्हॉट्सअॅपवर कसे मेसेज शेड्यूल करता येते. यासंबंधी खास सोप्या टिप्सची माहिती देत आहोत. वाचाः अँड्रॉयड फोनवर असे करा अँड्रॉयड युजर व्हॉट्सअॅप मेसेज शेड्यूल करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवर जा. आणि SKEDit अॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर SKEDit अॅपवर साइन करा. स्केडइट वर लॉग इन केल्यानंतर मेन मेन्यू मध्ये जावून व्हॉट्सअॅपवर क्लिक करा. त्यानंतर जी पुढची स्क्रीन दिसेल त्यात तुम्हाला SKEDit युज करण्यासाठी परमिशन देणार आहे. तसेच Use Service ला Allow करावे लागेल. त्यानंतर SKEDit च्या मदतीने तुम्हाला ज्यांना मेसेज पाठवायचे आहे त्यांना Add करा. त्यानंतर मेसेज लिहा आणि schedule date and time करा. यात रिपीटचा ऑप्शन सुद्धा दिला आहे. याच्या मदतीने तुम्ही वारंवार मेसेज पाठवू शकता. वाचाः iPhone वर असे करा व्हॉट्सअॅप मेसेज शेड्यूल अँड्रॉयड फोन प्रमाणे आयफोनमध्ये अॅप स्टोरवर व्हॉट्सअॅप मेसेज शेड्यूल करण्यसाठी कोणतीही थर्ड पार्टी अॅप नाही. त्यामुळे युजर्सला सीरी शॉर्टकट द्वारे मेसेज शेड्यूल करू शकता येते. यासाठी अॅप स्टोर वर जावून Shortcuts अॅप डाउनलोड करा. त्यानंतर पुन्हा अॅप उघडा. त्यानंतर खाली दिलेल्या Automation टॅबला सिलेक्ट करा. डाव्या बाजुला दिसत असलेल्या +icon वर क्लिक करा Create Personal Automation सिलेक्ट करा. वाचाः यानंतर पुढील स्क्रीनवर ऑटोमेशन चालवण्यासाठी Time of Day वर टॅप करा. त्यात मेसेज पाठवण्यासाठी डेट आणि टाइम सिलेक्ट करा. हे सर्व झाल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. यानंतर सर्च मध्ये Add Action वर क्लिक करा आणि लिस्ट मध्ये दिसत असलेल्या टेक्स्टला सिलेक्ट करा. पुन्हा टेक्स्ट सेक्शन मध्ये मेसेज लिहा आणि +icon वर टॅप करून सर्च बार मध्ये व्हॉट्सअॅप शोधा. यानंतर तुम्हाला Send Message via WhatsApp दिसेल. यावर क्लिक करा आणि पुन्हा नेक्स्ट बटनवर क्लिक करा. यानंतर पुढील स्क्रीनवर तुम्हाला Done बटन दिसेल. यावर क्लिक करताच तुमचे काम होईल. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mhAWni

Comments

clue frame