Vivo Y1s पॉवरफुल फीचर्ससोबत भारतात लाँच, किंमत ७९९० ₹

नवी दिल्लीः टेक ब्रँड विवोकडून भारतीय मार्केटमध्ये नवीन एन्ट्री लेवल लाँच करण्यात आला आहे. विवो इंडियाच्या अधिकृत साइट लिस्टिंगवरून चे फीचर्स समोर आले असून कंपनीने या फोनची किंमत ८ हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. या फोनमध्ये मोठा डिस्प्ले आणि दमदार बॅटरी सोबत मीडियाटेकचे प्रोसेसर दिले आहे. वाचाः किंमत आणि ऑफर्स विवोचा नवीन एन्ट्री फोनची किंमत ७ हजार ९९० रुपये आहे. यात दोन कलर ऑप्शन ऑरोरा ब्लू आणि ऑलिव ब्लॅक मध्ये खरेदी करता येवू शकतो. रिलायन्स जिओच्या लॉक इन ऑफर सोबत हा फोन खरेदी करणाऱ्या युजर्संना ४५५० रुपयांचे बेनिफिट्स २४९ रुपयांच्या रिचार्जवर मिळणार आहे. याशिवाय, ७९९ रुपयांपर्यंत १० टक्के बेनिफिट आणि ९९ रुपयांत ९० दिवसांचा शेमारू ओटीटी सब्सक्रिप्शन सुद्धा मिळणार आहे. OneAssist सोबत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट सुद्धा कंपनी ६ महिन्यांपर्यंत ऑफर करीत आहे. वाचाः Vivo Y1s चे वैशिष्ट्ये बजेट डिव्हाइस Vivo Y1s मध्ये ६.२२ इंचाचा Hao FullView LCD डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सोबत दिला आहे. फोनचा डिस्प्ले एचडी प्लस रिझॉल्यूशन (720x1520 पिक्सल्स) सोबत येतो. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला असून मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकतो. वाचाः विवोच्या या फोनमध्ये अँड्रॉयड 10 बेस्ड FunTouch OS 10.5 दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर रियरवर १३ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा एलईडी फ्लॅश सोबत दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4030mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37dCrwa

Comments

clue frame