Vi ठरले भारताचे सर्वांत वेगवान फोर जी

पुणे : वोडाफोन आणि आयडिया या भारतातील दोन ब्रॅंडचे विलीनीकरण तयार झालेल्या Vi ला भारतात सर्वांत वेगवान "फोर जी' बनण्याचा बहुमान मिळाला आहे. "ओओकेएलए' (द ग्लोबल ब्रॉडबॅण्ड स्पीड टेस्ट) ने Vi डाऊनलोड आणि अपलोड या दोन्हींमध्ये सर्वांत वेगवान असल्याचे घोषित केले आहे.

वोडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणानंतर अनेक शहरे आणि राज्यांमध्ये एकत्रित नेटवर्क सर्वांत वेगवान बनले आहे. "ओओकेएलए' ने मोठ्या प्रमाणावर नेटवर्क सुधारल्याचीही पुष्टी दिली आहे. Vi भारतातील सर्वांत "कंसिस्टंट फोर जी' ही बनले आहे. त्याचमुळे जेव्हा आणि जिथे हवं तिथे Vi अत्यंत जलद स्पीड देते. स्पीडटेस्ट डेटा पाहिला असता 13.74 एमबीपीएस डाऊनलोड तर 6.19 एमबीपीएस अपलोड असल्याचे समोर आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Vi कडे भारतातील सर्वांत मोठे स्पेक्‍ट्रम आहे. त्यातील बराच भाग "फोर जी' सेवेसाठी वापरला जातो. ज्यामुळे "फोर जी' सेवा जवळजवळ शंभर कोटी भारतीयांपर्यंत पोचली आहे. Vi हे भविष्यातील सज्ज झालेलं नेटवर्क आहे. "फाइव्ह जी' आर्किटेक्‍चर हा त्याचा पाया आहे. या नेटवर्कने भारतीय ग्राहकांना आधुनिक टेलिकॉम टेक्‍नॉलॉजीची ओळख करून देणाऱ्या पहिल्या कंपनीज्‌मध्ये Vi आहे.

दहा हजारपेक्षा जास्त साइटसवर डायनॅमिक स्पेक्‍ट्रम रिफॉर्मिंगची सुरुवात करणारा Vi हा पहिला टेलिकॉम ऑपरेटर आहे. 80 पेक्षा जास्त साइट्‌सवर सर्वांत मोठा क्‍लाऊड डिप्लॉयमेंट केला असून, लो लेटन्सी मिळते आणि म्हणून हे रिअल टाइम ऍप्लिकेशन्स आणि हायपर-कनेक्‍टेड यूज केसेससाठी उत्तम नेटवर्क आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप



from News Story Feeds https://ift.tt/2It6KXk

Comments

clue frame