Redmi Note 9 Pro 5G चा फोटो लाँचआधीच जारी, रियर डिझाइनची माहिती उघड

नवी दिल्लीः रेडमी गुरुवारी आपल्या रेडमी नोट ९ सीरीज वरून पडदा हटवणार आहे. आता लाँच आधीच रेडमीचे जनरल मॅनेजर ल्यू विबिंगने संकेत दिले आहेत की, रेडमी नोट ९ सीरिजमध्ये असा कॅमेरा असणार आहे जो आधी कोणत्याही फोनमध्ये पाहिला गेला नसेल. यावरून लीक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, Redmi Note 9 सीरीजमध्ये १०८ मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम२ लेन्स असणार आहे. विबिंगने फोनचा फोटो शेयर केला आहे. ज्यात नोट ९ प्रो ५ जी ची रियर डिझाइनची माहिती उघड झाली आहे. वाचाः मल्टीपल रियरवरून ही माहिती उघड झाली आहे की, शाओमी मी १० टी लाइटला रिब्रँड करून चीनमध्ये रेडमी नोट ९ प्रो ५ जी च्या नावाने लाँच केले जाणार आहे. दोन्ही फोन्समध्ये केवळ प्रायमरी कॅमेराचा फरक आहे. Mi 10T Lite मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे. तर रेडमी नोट ९ प्रो ५जी मध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेराचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. वाचाः रेडमी नोट ९ प्रो जी च्या अधिकृत मी १० टी लाइटच्या रोज गोल्ड ब्लीच कलर व्हेरियंटची झलक पाहायला मिळत आहे. फोनचा रियर शेल AG (Anti-Glare) बनले आहे. मॅट फिनिशसोबत येते. फोनच्या उजव्या बाजुला वॉल्यूम रॉकर आणि किनाऱ्यावर फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. राउंड शेपच्या कॅमेरा मॉड्यूल मध्ये चार कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश दिला आहे. वाचाः चे वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.६७ इंचाचा आयपीएस एलसीडी फुल एचडी प्लस १२० हर्ट्ज डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ७५० जी चिपसेट, फोनला पॉवर देण्यासाठी 4820mAh ची बॅटरी, ३३ वॉट फास्ट चार्जिंग यासारखे फीचर्स दिले आहेत. हा फोन अँड्रॉयड १० ओएस बेस्ड MIUI 12 वर काम करतो. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, स्टीरियो स्पीकर, ३.५ एमएम ऑडियो जॅक, एनएफसी, आयआर ब्लास्टर आणि झेड एक्सिस लीनियर मोटर दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3702oQ0

Comments

clue frame