Poco M3 ची लाँचिंग २४ नोव्हेंबरला कन्फर्म, कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स मिळणार

नवी दिल्लीः शाओमीपासून वेगळे होऊन स्वतंत्र ब्रँड बनले आहे. कंपनी आता नवीन - नवीन डिव्हाइसेज लाँच करीत आहे. पोकोच्या दोन डिव्हिजन ग्लोबल आणि इंडिया वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत आहे. दोन्ही प्रोडक्टचे पोर्टफोलियो एकदम वेगळे आहेत. पोको ग्लोबल कडून सांगण्यात आले आहे की, कंपनी २०२० च्या अखेरमध्ये एक नवीन डिव्हाइस आणणार आहे. आता पोको ग्लोबलने कन्फर्म केले आहे की, २४ नोव्हेंबर रोजी बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. वाचाः नवीन पोको डिव्हाइस संबंधी लीक्स आणि रिपोर्ट्स समोर येत होत्या. आता याचे नाव सुद्धा अधिकृतपणे कन्फर्म झाले आहे. पोको ग्लोबलकडून ट्विटरवर एक टीझर शेयर करण्यात आला आहे. यात सांगितले की, कंपनी २४ नोव्हेंबर रोजी Poco M3 घेवून येणार आहे. कंपनीकडून म्हटले की, या डिव्हाईसला एका स्पेशल इव्हेंटमध्ये भारतीय वेळेनुसार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता लाँच करण्यात येणार आहे. पोकोची एम सीरीजच्या नवीन डिव्हाइस संबंधी डेटल आतापर्यंत समोर आली नाहीत. वाचाः असे असणार वैशिष्ट्ये पोकोचा हा स्मार्टफोन Redmi Note 10 4G चे ट्वीक्ड व्हर्जन असू शकतो. गीकबेंच लिस्टिंगमध्ये याचे काही डिटेल्स समोर आले आहेत. फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर ४ जीबी रॅम सोबत येते. TENNA लिस्टिंग वरून समोर आलेल्या डिटेल्सनुसार, फोनमध्ये ६४ जीबी इंटरनल स्टोरेज शिवाय, ६.५३ इंचाचा IPS LCD डिस्प्ले ड्यूड्रॉप नॉच सोबत मिळू शकते. कंपनी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देवू शकते. वाचाः मोठी 6000mAh बॅटरी समोर आलेल्या माहितीनुसार, Poco M3 च्या रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. डिव्हाइसमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. फोनमध्ये अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकतो. तसेच फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली जावू शकते. फोनमध्ये २२.५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kHX9cg

Comments

clue frame