नवी दिल्लीः चायनीज टेक कंपनी पोकोकडून ग्लोबल मार्केटमध्ये नवीन बजेट लाँच करण्यात आला आहे. पोकोने आपला बजेट स्मार्टफोन Poco M2 चा सक्सेसर म्हणून हा स्मार्टफोन आणला आहे. नवीन फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. तसेच या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर आणि ट्रिपल प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला आहे. सध्या या फोनला भारतात लाँच वरून पोको इंडियाने कोणतीही माहिती दिली नाही. वाचाः Poco M3 ची किंमत कंपनीने या फोनला दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंट्समध्ये आणले आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची किंमत १४९ डॉलर (जवळपास ११ हजार रुपये) ठेवण्यात आली आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६९ डॉलर म्हणजेच १२ हजार ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी या फोनच्या लाँच ऑफर सोबत २० डॉलर जवळपास १५०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या डिव्हाईसेजला २७ नोव्हेंबर पासून ब्लॅक, ब्लू, आणि यलो कलरमध्ये खरेदी करता येवू शकणार आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सोबत दिले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर मिळणार आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. या फोनमध्ये अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 आउट-ऑफ-द-बॉक्स यूजर्सला मिळणार आहे. या फोनमध्ये यूएसबी टाइप सी कनेक्टिविटी दिली आहे. वाचाः या फोनमध्ये कॅमेरा सेटअप सोबत रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर शिवाय २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंगसोबत 6000mAh मोठी बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fvB1B3
Comments
Post a Comment