Nokia 2.4 भारतात लाँच, २ वर्षांपर्यंत मिळणार अँड्रॉयड अपग्रेड, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः HMD Global ने भारतात लाँच केला आहे. या फोनचा एकच व्हेरियंट आणला गेला आहे. यात ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचा स्टोरेज दिला आहे. या फोनची किंमत १० हजार ३९९ रुपये आहे. तसेच हा फोन नोकियाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येवू शकतो. वाचाः लाँच केलेल्या या फोनला कंपनीने सध्या अँड्रॉयड १० सोबत लाँच केले आहे. परंतु, Android 11 तयार आहे. आगामी काही दिवसात कंपनी Android 11 अपडेट करणार आहे. Nokia 2.4 ला नोकियाच्या वेबसाइटवरून आजपासून खरेदी करता येवू शकते. कंपनीने सांगितल्यानुसार, सर्वात पहिल्या १०० ग्राहकांना २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत कंपनी वेबसाइटवरून ऑर्डर प्लेस केल्यास त्यांना जेम्स बाँड ००७ चे मर्चेंडाइज हँपर दिला जाणार आहे. यात ००७ स्पेशल एडिशन बॉटल, कॅम्प आणि मेटलची चेन याचा समावेश आहे. ४ डिसेंबर पासून नोकियाचा हा फोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध केला जाणार आहे. वाचाः या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनमध्ये MediaTek Helio P22 दिला आहे. फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. फोनची बॅटरी 4,500mAh दिली आहे. कनेक्टिविटीसाठी यात यूएसबी टाईप सी दिली आहे. या फोनमध्ये हेडफोन जॅक दिले आहे. यात मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट दिला आहे. या फोनला युरोपमध्ये सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. आता याला भारतात लाँच करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l9nwIz

Comments

clue frame