नवी दिल्लीः नवीन नोकिया २.४ स्मार्टफोनला अखेर याच महिन्यात लाँच करणार आहे. आता कंपनीने अधिकृत माहिती दिली आहे. भारतात नोकिया २.४ आणि नोकिया ३.४ स्मार्टफोन्सला येत्या २६ नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. वाचाः नोकिया मोबाइल इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक टीजर व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओत नोकिया २.४ आणि नोकिया ३.४ ला 'only 10 days to go' कॅप्शन सोबत पाहिले जावू शकते. ट्विटवरून हे स्पष्ट झाले आहे की, ब्रँडच्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोन्सला अधिकृत देशात २६ नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. वाचाः गेल्या आठवड्यात आलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली होती. रिपोर्टमध्ये केवळ नोकिया २.४ ची केवळ भारतात माहिती होती. यावरून अंदाज बांधला जावू शकतो. की, नोकिया २.४ ला विक्रीसाठी लाँच नंतर तर नोकिया ३.४ला काही दिवसांनंतर विक्रीसाठी उपलब्ध केले जावू शकते. वाचाः नोकिया फोन्सला देशात १० हजार रुपयांच्या एन्ट्री लेवल सेगमेंटमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. नोकिया ३.४ ची किंमत यूरोपमध्ये १५९ यूरो (जवळपास १३ हजार ७०० रुपये) तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११९ यूरो (जवळपास १० हजार ३०० रुपये) आहे. वाचाः नोकिया ३.४ चे वैशिष्ट्ये नोकिया ३.४ अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम सोबत येतो. या डिव्हाईसमध्ये ६.३९ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. बजेट फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले डिझाइन दिली आहे. हँडसेटमध्ये गुगल असिस्टेंट बटन दिला आहे. नोकिया फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोनमध्ये रियर कॅमेऱ्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. नोकिया ३.४ मध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीने फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. वाचाः नोकिया २.४ चे वैशिष्ट्ये नोकियाच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोन अँड्रॉयड १० वर काम करतो. हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर दिला आहे. नोकिया २.४ मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. हँडसेटमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UAY5Vw
Comments
Post a Comment