नवी दिल्लीः जगभरात आता ५ वे जनरेशन नेटवर्क म्हणजेच 5G ची चलती जोरात सुरू झाली आहे. भारतात सुद्धा हळूहळू ५जी आपले पाय पसरवत आहे. अनेक कंपन्या आता भारतात आपले ५ जी स्मार्टफोन्स लाँच करीत आहेत. आता मोटोरोला आपला नवीन मिड रेंज ५ जी स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी करीत आहे. वाचाः सर्वात स्वस्त ५जी फोन असू शकतो मोटो जी या फोनच्या किंमतीवरून अद्याप पडदा हटवला गेला नाही. परंतु, असे मानले जात आहे की, भारतात सर्वात स्वस्त ५जी फोन असू शकतो. याआधी कंपनीने मोटो जी ५ प्लस भारतात लाँच केलेला आहे. कंपन्या आता भारतात ५जी सेगमेंटमध्ये अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करीत आहे. वाचाः या ब्रँड्सशी होणार टक्कर मोटोरोलाच्या स्वस्त ५जी फोन द्वारे भारतात रियलमी, शाओमी, यासारख्या ब्रँड्सला टक्कर देण्यसोबतच OnePlus N10 5G च्या फोन सोबत या फोनची टक्कर होणार आहे. ही कंपनीची एन्ट्री लेवल ५ जी कनेक्टिविटीचा स्मार्टफोन असणार आहे. वनप्लस एन १० ५जी गेल्या २६ ऑक्टोबर रोजी अमेरिकेत लाँच करण्यात आला होता. सर्वात कमी किंमतीचा ५जी फोन आहे. आता मोटोरोला सुद्धा वनप्लस सोबत सॅमसंग, अॅपल, हुवावे आणि एमआयला टक्कर देण्यासाठी स्वस्त ५जी फोन आणत आहे. या सेगमेंटमध्ये खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. वाचाः ट्रिपल रियर कॅमेरा असणार Motorola Moto G 5G च्या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप असणार आहे. यात प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. जो Samsung GM1 सेंसर सोबत आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा तिसरा कॅमेरा आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kQwkCX
Comments
Post a Comment