नवी दिल्लीः देसी इंडिया कंपनीचा मायक्रोमॅक्सचा जलवा पुन्हा एकदा दिसला. देसी कंपनीची स्मार्टफोन मार्केटमध्ये जोरदार पुनरागमन झाले आहे. मायक्रोमॅक्स इन सीरीजचे स्मार्टफोन्स Micromax In 1B आणि ची खूप चर्चा होत आहे. लाँच नंतर या फोनची बुकिंग सुरू होऊन तो तासात बुकिंग फुल झाली आहे. आज २४ नोव्हेंबर रोजी Micromax In Note 1 चा पहिला सेल सुरू झाला. हा फोन अवघ्या मिनिटात आउट ऑफ स्टॉक झाला आहे. आता मायक्रोमॅक्सने घोषणा केली आहे की, मायक्रोमॅक्स इन नोट १ चा पुढील सेल १ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. वाचाः पुढच्या वेळी उशीर करू नका ज्या लोकांना Micromax In Note 1 ला पहिल्या सेलमध्ये खरेदी करता आले नाही. त्यांना १ डिसेंबर रोजी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चायनीज स्मार्टफोन मेकरला इन सीरीजचे स्मार्टफोन्स टक्कर देण्याचा प्रयत्न करीत आहे. यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. मायक्रोमॅक्सच्या रुपाने ग्राहकांना एक चांगला पर्याय मिळाला आहे. वाचाः या देसी फोनचे खास वैशिष्ट्ये Micromax In Note 1 च्या 4GB RAM प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले दिले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८५ प्रोसेसर दिला आहे. वाचाः बॅटरी आणि कॅमेरा मायक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिलीआहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, तसेच ५ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ७८ डिग्री वाइड अँगल सोबत १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33cHlbw
Comments
Post a Comment