Micromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने जोरदार पुनरागमन केले आहे. नवीन इन सीरीज कंपनीने लाँच केली आहे. या सीरीजमध्ये In Note 1 आणि In 1b हे दोन फोन लाँच केले आहेत. आधी In Note 1 चा २४ नोव्हेंबर रोजी फ्लॅश सेल पार पडला. अवघ्या काही मिनिटात हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला आहे. आज स्वस्तातील Micromax In 1b चा सेल आहे. आज दुपारी १२ वाजता शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्स इंडियाची अधिकृत वेबसाईटवरून हा फोन खरेदी करता येवू शकणार आहे. वाचाः किंमत आणि ऑफर्स Micromax In 1b ला कंपनीने दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंट्समध्ये लाँच केले आहे. आधी २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६९९९ रुपये ठेवली आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड्सवरून ईएमआय ट्रान्झॅक्शन केल्या ५ टक्के कॅशबॅक, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून युजर्संना ५ टक्के कॅशबॅक आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्ड युजर्संना ५ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. वाचाः Micromax In 1b फोनची वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.५२ इंचाचा IPS LCD डिस्प्ले HD+ रेजॉलूशन (1600x720 पिक्सल्स) सोबत दिले आहे. यात वॉटरड्रॉप स्टाइल नॉच मिळतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला असून फोनमध्ये मीडियाटेक चा Helio G35 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सरचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39e112M

Comments

clue frame