Jio vs Airtel vs Vi: ७४० जीबीपर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः कोविड-१९ नंतर देशभरात वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लास आणि मूव्ही स्ट्रीमिंग तसेच ऑनलाइन गेमिंग मुळे लोकांना जास्तीचे इंटरनेट लागत आहे. परंतु, देशातील टेलिकॉम कंपन्या स्वस्त किंमतीत जास्तीत जास्त डेटा देण्याचा प्रयत्न करीत आहे. वोडाफोन आपल्या काही रिचार्ज प्लानमध्ये डबल डेटा ऑफर करीत आहे. जर तुम्हाला जबरदस्त प्लान हवा असेल तर या ठिकाणी खास प्लानची माहिती देत आहोत. वाचाः २५९९ रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक जिओच्या या रिचार्ज प्लानची वैधता ३६५ दिवस म्हणजेच एक वर्षाची आहे. या रिचार्ज प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा प्रमाणे एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. तसेच १० जीबी अतिरिक्त डेटा या पॅकमध्ये मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ७४० जीबी डेटा मिळतो. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन जिओ नेटवर्कवर १२ हजार मिनिट्स ऑफर केले जाते. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री दिले जाते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा फ्री मिळते. तसेच एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे एका वर्षासाठी जिओच्या या प्लानमध्ये मिळते. वाचाः २६९८ रुपयांचा एअरटेल रिचार्ज पॅक एअरटेलच्या या रिचार्ज पॅकची किंमत २६९८ रुपये आहे. या पॅकची वैधता ३६५ दिवस आहे. या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो, म्हणजेच एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. जिओच्या पॅकपेक्षा वेगळा असलेल्या या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग नेटवर्कवर एकदम फ्री आहे. वाचाः एअरटेलच्या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपीचे एका वर्षाचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. तसेच या पॅकमध्ये फ्री हेलोट्यून्स, फ्री ऑनलाइन कोर्स, एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम, विंक म्यूझिक फ्री मिळते. फास्टॅग खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. वाचाः २४९८ रुपयांचा एअरटेल रिचार्ज पॅक एअरटेलच्या या पॅकची वैधता ३६५ दिवस आहे. या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. या पॅकमध्ये युजर्संना रोज १०० एसएमएस मिळतात. २६९८ रुपयांप्रमाणे या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळत नाही. या प्लानमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम, विंक म्यूझिक, फ्री हेलोट्यून्स आणि शॉ अकादमीचे एक वर्षाचा ऑनलाइन कोर्स फ्री मध्ये ऑफर केला जातो. फास्टॅग खरेदी वर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. वाचाः वोडाफोन-आयडियाचा २५९९ रुपयांचा रिचार्ज पॅक वोडाफोन - आयडियाच्या या रिचार्ज पॅकची वैधता ३६५ दिवसांची आहे. या रिचार्ज पॅकमध्ये रोज २ जीबी डेटाचा वापर केला जातो. म्हणजेच एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. सर्व नेटवर्कवर एसटीडी आणि लोकल कॉलसाठी अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग मिनिट्स मिळते. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. या पॅकमध्ये विकेंड डेटा रोलओवरची सुविधा मिळते. तसेच झी५ चे अॅक्सेस एक वर्षासाठी फ्री मिळते. तसेच Vi Movies & TV चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2J7rVyu

Comments

clue frame