Google फोटोची फ्री सेवा मिळणं होणार बंद; मोजावे लागणार पैसे

नवी दिल्ली - गूगलच्या (Google) गूगल फोटो सर्व्हिसमध्ये (Google photo Service) युजर्सना फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करता येतात. आता युजर्सना गूगलने दणका दिला आहे. येत्या काही दिवसात या फ्री सर्व्हिससाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत गूगल फोटोच्या सर्व्हिससाठी चार्ज आकारला जात नव्हता. मात्र गूगलच्या नव्या पॉलिसीनुसार (google New Policy) युजर्सना 15 जीबी पेक्षा जास्त डेटा अपलोड केल्यास चार्ज द्यावा लागणार आहे. गूगलची ही पॉलिसी आधीपासून जीमेल (Gmail) आणि गूगल ड्राइव्हला (Google Drive) आधीपासूनच लागू आहे. 

गूगलची नवीन पॉलिसी 1 जून 2021 पासून लागू केली जाणार आहे. त्यानुसार गूगल फोटो सर्व्हिसवर 15 जीबी पेक्षा जास्त डेटा अपलोड केल्यास 1 जून 2021 पासून युजर्सना पैसे आकारले जातील. यासोबत गूगलने असंही स्पष्ट केलं आहे की, जे युजर्स 1 जून 2021 च्या आधी जितका डेटा युज करतील त्यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. युजर्सनी आता यापुढे महत्वाचे आणि चांगले फोटोच सेव्ह करावेत असं गूगलने सांगितलं आहे. 

गूगल फोटोवर दर आठवड्याला जवळपास 28 अब्ज इतके नवीन फोटो अपलोड केले जातात. गूगलने असं म्हटलं आहे की, नवीन पॉलिसी लागू केल्यानंतर तीन वर्षापर्यंत जवळपास 80 टक्के युजर्स 15 जीबी डेटा अपलोड करू शकणार नाहीत. त्यामुळे सबस्क्रिप्शन घ्यावं लागणाऱ्या युजर्सची संख्या कमी असेल. ज्या युजरचा डेटा 15 जीबी होण्यासाठी थोडा कमी असेल तर याबाबत मेलद्वारे नोटिफिकेशन पाठवण्यात येईल.

हे वाचा - जगभरात काही तासांसाठी YouTube सेवा विस्कळीत

गूगलच्या नव्या पॉलिसीनुसार युजर्सना 15 जीबी डेटा फ्री असेल. जर युजर्स 15 जीबी पेक्षा जास्त डेटा वापरत असतील तर त्यांना कमीत कमी 100 जीबीचे स्टोरेज घ्यावं लागेल. त्यासाठी प्रत्येक महिन्याला 130 आणि वर्षाला 1300 रुपये द्यावे लागतील. युजर्सनी जर 200 जीबी स्टोरेजचा प्लॅन खरेदी केला तर त्यांना महिन्याला 210 रुपये द्यावे लागतील. तसंच 2 टीबी आणि 10 टीबी स्टोरेजसाठी युजर्सना महिन्याला अनुक्रमे 650 रुपये आणि 3250 रुपये द्यावे लागतील. 



from News Story Feeds https://ift.tt/3nlMZ2Z

Comments

clue frame