Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड

नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने ग्राहकांना फेक एसएमएस पाठवल्याप्रकरणी भारतातील ८ टेलिकॉम कंपन्यांवर संयुक्तपणे ३५ कोटींचा दंड ठोठावला आहे. या कंपन्यांत सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल, एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया, एमटीएनएल, विडिओकॉन, टाटा टेलिसर्विसेस, क्वॉर्डरंट टेलिसर्विस यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांवर आरोप आहे की, त्यांनी सायबर क्रिमिनल्सला डिजिटल पेमेंट यूजर्सला फेक एसएमएस पाठवण्याची परवानगी दिली. वाचाः ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यावर आरोप ठेवला आहे की, त्यांनी टेलिकॉम कमर्शल कम्यूनिकेशन कस्टमर प्रीफरेंन्स रेग्युलेशनचे उल्लंघन केले आहे. आमचे सहकारी इकॉनॉमिक टाइम्सला मिळालेल्या डॉक्यूमेंट्समधून याची माहीती उघड झाली आहे. वाचाः बीएसएनएलवर सर्वात जास्त दंड ट्रायने सर्वात जास्त दंड ३०.१ कोटींचा बीएसएमएलवर ठोठावला आहे. बीएसएनएल ट्रायच्या शोकॉज नोटीसला उत्तर देण्यात अपयशी ठरली. तसेच त्यांनी परफॉर्मन्स मॉनिटरींग रिपोर्ट दाखवले. जे १.८२ कोटी रुपये आहे. त्यानंतर १४१ कोटी रुपये क्वॉर्डरंट टेलिसर्विस आणि १.३३ कोटी रुपये दंड एअरटेलवर लावला आहे. बाकीच्या कंपन्यावर सुद्धा अशाच प्रकारे दंड लावला आहे. परंतु, रक्कम कमी आहे. वाचाः फेक एसएमएस आणि स्पॅम कॉलचा खेळ गेल्या सप्टेंबर महिन्यात दिल्ली हायकोर्टाने ट्रायला सर्विस प्रोवाडइडर विरुद्ध कारवाई करताना निर्देश दिले होते. ज्या ग्राहकांना एसएमएस पाठवतात किंवा कॉल करतात. याप्रकरणी हायकोर्टाच्या एका वकिलाने सांगितले की, ज्या टेलिकॉम कंपन्यांना दंड लावला आहे. ते या विरोधात कोर्टात जातील. ट्रायच्या म्हणण्यानुसार, टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या नेटवर्कवरून केले जात असलेले मेसेजला योग्य पद्धतीने मॉनिटर केले गेले नाही. त्यामुळे युजर्संना फेक मेसेज आणि कॉल्स जात आहे. त्यामुळे युजर्संना त्रास सहन करावा लागला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/365w8LL

Comments

clue frame