Diwali 2020 - मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी खास गिफ्ट; तीन Festive Variants लाँच 

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने दिवाळी सणानिमित्त ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. सर्वात लोकप्रिय अशा मारुती सुझुकी अल्टो, मारुती सुझुकी सेलेरिओ आणि मारुती सुझुकी वॅगनआरचे खास Festive Variants लाँच केले आहेत. आकर्षक अशा या कारमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. कंपनीने तीन कारच्या फेस्टिव्ह एडीशनमध्ये लूक, स्टाइल आणि कम्फर्टकडे विशेष लक्ष दिलं आहे. तसंच यामध्ये स्पेशल किटसुद्धा ऑफर केलं आहे.

मारुतीने फेस्टिव्ह एडिशन किटमध्ये अल्टोसाठी 25,490 रुपये, सेलेरिओसाठी 25,990 रुपये आणि वॅगनआरसाठी 29,990 रुपयात लाँच केलं आहे. या तीनही कारचे ग्राहक त्यांच्या जवळच्या मारुती सुझुकी डीलरशिपकडे जाऊन फेस्टिव्ह सिझन किट्स गाडीमध्ये फिट करू शकतात. तसंच फेस्टिव्ह सिझनमध्ये कार खरेदी करणाऱ्यांनाही हे किट मिळणार आहे. म्हणजेच मारुती सुझुकी या तीन कारच्या फेस्टिव्ह एडिशनची किंमत सध्याची किंमत आणि फेस्टिव्ह किट मिळून ठरवणार आहे.

Maruti Alto  Festive Edition
मारुती सुझुकी अल्टो फेस्टिव्ह एडीशनमध्ये 6 इंचाचे Kenwood स्पीकर्स, Pioneer टचस्क्रीन म्यूझिक सिस्टिम, ड्युअल टोन सीट कव्हर्स, स्टेअरिंग व्हील कव्हर, नवीन फ्लोअर मॅट, सिक्युरिटी सिस्टिम आणि कीलेस एंट्री यांसारख्या अॅक्सेसिरीजचा समावेश आहे. ऑल्टोच्या या खास एडीशनमद्ये 0.8 लीटर पेट्रोल इंजिन असून 48 पीएस क्षमता आहे. तसंच 69 एनएम टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकीच्या या एंट्री लेव्हल कारमध्ये सीएनजी व्हेरिअंटसुद्धा आहे. ही कार 5 स्पीड गिअरबॉक्ससोबत उपलब्ध आहे.

हे वाचा - इलेक्ट्रिक टू - व्हीलर घ्यायची आहे.? हे आहेत ५ उत्तम पर्याय

Maruti Celerio Festive Edition
मारुती सुझुकीच्या सेलेरिओ फेस्टिव एडिशनमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्ही असलेले सोनी कंपनीची डबल डीन ऑडिओ सिस्टिम आहे. यासोबत स्टायलिश सीट कव्हर, रिअर सीट कुशन, डिझायनर फ्लोअर मॅट, पियानो बॉडी साइड मोल्डिंग, डोअर व्हीजनसह इतर फीचर्स आहेत. मारुती सुझुकी सेलेरिओच्या या खास व्हेरिअंटमध्ये 1.0 लीटरचं पेट्रोल इंजिन आहे. 68 पीएस क्षमतेचं इंजिन असून ही कार मॅन्युअलसह ऑटोमॅटिक व्हेरिअंटमध्येसुद्धा मिळते.

हे वाचा - ह्युंडाइची All New i20 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maruti WagonR Festive Edition
मारुती सुझुकी वॅगनआरच्या फेस्टिव्हल एडिशनमध्ये थीम असलेले सीट कव्हर्स देण्यात आले असून इंटिरिअर स्टायलिंग किटचा समावेश आहे. यामध्ये डिझायनर मॅट्स, साइड स्कर्ट, फ्रंट आणि रिअर बंपर प्रोटेक्टर्ससोबत व्हील आर्क क्लॅडिंगसुद्धा आहे. मारुती सुझुकी वॅगनआरचं हे खास व्हेरिअंट 1.0 आणि 1.2 लीटर अशा दोन प्रकारच्या पेट्रोल व्हेरिअंटमध्ये आहे. तसंच या कारचे सीएनजी व्हेरिअंटसुद्धा आहे. 



from News Story Feeds https://ift.tt/2IBNJ4Z

Comments

clue frame