गेल्या आठवड्यात आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे (एसईओ) महत्त्व, ‘गुगल’ किंवा अशी सर्च इंजिन्स अशा वेबसाइट्स कशा ‘वाचतात’; तुमच्या वेबसाइटवरचा मजकूर गुगलला ‘वाचायला’ कसा सोपा जाईल, ज्यामुळे गुगल सर्चमध्ये तुमच्या वेबसाइटचा क्रमांक आणखी वरचा असेल, आदी गोष्टींबाबत माहिती घेतली. आता आपण आणखी थोडे तपशिलात जाऊ.
गुगलवर तुमच्या वेबसाइट्सचे रँकिंग ठरवणारे घटक आणि तुमच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कीवर्ड्सबाबत तुम्ही संशोधन कसे करू शकाल आदी गोष्टींवर आपण नजर टाकू. एसईओमध्ये तीन मुख्य आधारस्तंभ असतात - रँकिंग, ॲथॉरिटी आणि रिलेव्हन्स.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रँकिंग
विशिष्ट सर्च क्वेरी टाकली जाते, तेव्हा गुगल सर्च पेजवर येणारे तुमच्या वेबसाइटचे स्थान म्हणजे रँक. सर्च इंजिन रिझल्ट्स पेजच्या (एसईआरपी) ऑर्गॅनिक सेक्शनमध्ये (वरच्या भागात असलेल्या पेड ॲड्स नव्हे) तुमची वेबसाइट पहिली दिसत असेल, तर तुमची रँक १ आहे. तुमची वेबसाइट दुसऱ्या स्थानावर असेल, तर तुमची रँक २ असेल. अशाच प्रकारे ही रँक पुढे त्या त्या स्थानावर अवलंबून असेल.
विशिष्ट कीवर्डसाठी तुमची रँक जरी ‘ऑथॉरिटी’ आणि ‘रिलेव्हन्स’ या गोष्टींनुसार ठरत असली, तरी तिच्यात होणाऱ्या बदलांवर देखरेख करत राहा म्हणजे तुम्हाला एसईओ तंत्रांबाबत अधिक कल्पना येईल. अर्थात, तिथे अनेक घटक तुमच्या नियंत्रणापलीकडचेही असल्याने केवळ या निरीक्षणांवरच अवलंबूनही राहू नका. तुमची वेबसाइट १ ते ५ स्पॉट्सने पुढे जात असेल, तर ती गोष्ट अपेक्षितच आहे. मात्र, ती रँकिंगमध्ये दहापेक्षा जास्त स्पॉट्सनी पुढे गेली, तर मात्र ती कामगिरी महत्त्वाची मानली पाहिजे.
ॲथॉरिटी
तुमच्या वेबसाइट्सला किती इनबाउंड लिंक्स (इतर वेबसाइट्समध्ये तुमच्या वेबसाइटसाठी असलेल्या लिंक्स) असतात, त्याची आकडेमोड करून सर्च इंजिन ती वेबसाइट किती ऑथॉरिटेटिव्ह आणि विश्वासार्ह आहे याचा अंदाज बांधत असते. मात्र, केवळ इनबाउंड लिंक्सची संख्या जास्त असल्याने ती वेबसाइट रँकिंगमध्ये पुढे जाईल असेही नसते. ज्या वेबसाइट्समध्ये तुमच्या वेबसाइटसाठी लिंक असतात, त्यांचं वजन किती आहे, तुमची वेबसाइट लिंक करण्यासाठी वापरलेला अँकर टेक्स्ट कोणता आहे, तुमच्या डोमेनचे वय काय आहे इत्यादी गोष्टीही सर्च इंजिन बघत असते.
उदाहरणार्थ, तुम्ही फुटबॉल शूज विकण्याच्या व्यवसायात आहात आणि त्याला दोन ठिकाणांहून लिंक्स आहेत. एक लिंक आहे एका ब्लॉगवरून आणि दुसरी लिंक आहे ॲमेझॉनवरून. तुम्ही युजर म्हणून कोणत्या ठिकाणी असलेल्या लिंकला जास्त महत्त्व द्याल? अर्थातच युजर म्हणून आपण या क्षेत्रात ॲमेझॉन ही जास्त अधिकार असलेली वेबसाइट आहे हे मान्य करू. याच पद्धतीने, आपण जेव्हा युजर म्हणून फोन स्पेसिफिकेशन्सची तुलना करत असतो, तेव्हा आपण gizinfo.com सारख्या सामायिक वेबसाइट्सपेक्षा gsmarena.com किंवा androidauthority.com यांसारख्या वेबसाइट्सवर जास्त भरवसा ठेवतो.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याचबरोबर, ज्या पेजेसमध्ये तुमच्या वेबसाइटसाठी लिंक असतात, त्यांचे रँकिंग ही गोष्टही तुमच्या वेबसाइटची रँक ठरवण्यावर प्रभाव पाडत असते. त्यामुळेच तुमच्या वेबसाइटच्या लिंक्स बाहेरच्या किती आणि कोणत्या दर्जाच्या वेबसाइट्सवर आहेत यानुसारही तुमच्या वेबसाइट पेजचे रँकिंग वाढत असते. कमी रँकिंग; मात्र जास्त संख्या असलेल्या पेजेसवर तुमच्या पेजच्या लिंक्स असतील तर त्यापेक्षा चांगले रँकिंग असलेल्या पेजेसवर तुमच्या पेजच्या लिंक असल्यास ते रँकिंग वरचे असेल.
रिलेव्हन्स
रिलेव्हन्स म्हणजे संदर्भ हा एसईओमधला अतिशय महत्त्वाचा घटक असतो. सर्च इंजिन्स तुम्ही फक्त विशिष्ट कीवर्ड्स वापरताय का एवढेच बघत नसतात, तर संबंधित क्वेरीला तुमचा मजकूर किती अनुसरून आहे याबाबतही त्या क्लूज शोधत असतात. तुमच्या वेबपेजेसवरच्या प्रत्यक्ष मजकुराबरोबरच सर्च इंजिन्स तुमच्या वेबसाइटचा आराखडा, तुमच्या यूआरएल्समध्ये संबंधित कीवर्ड्सचा वापर, पेज फॉर्मॅटिंग (उदाहरणार्थ बोल्ड केलेला मजकूर); तसेच कीवर्ड्स शीर्षकांत आहेत की मजकुरात अशा सगळ्या गोष्टींचाही आढावा घेत असतात. त्यामुळेच मजकुराचे योग्य पद्धतीने फॉर्मॅटिंग आणि ते अतिशय वाचक-अनुकूल बनवणे महत्त्वाचे.
कीवर्डबाबत असा करा विचार
फक्त अंदाज बांधण्यातून काही साध्य होत नाही. त्याऐवजी तुमच्या व्यवसायासाठी योग्य असलेल्या कीवर्ड्सबाबत संशोधन करणे आणि ते शोधणे ही गोष्ट जास्त योग्य.
वेब ॲनॅलिटिक्स
गुगल ॲनॅलिटिक्ससारख्या टूल्सचा वापर करून तुम्ही कोणते ऑर्गॅनिक कीवर्ड्स तुमच्या वेबसाइटकडे ट्रॅफिक आणत आहेत ते बघू शकता. ही टूल्स तुम्हाला कोअर कीवर्ड्सची यादी देतील आणि तुमच्या संभाव्य एसईओ प्रयत्नांसाठी अधिक कीवर्ड्सही सुचवतील.
उदाहरणार्थ, खालील स्क्रीनशॉटकडे बघा. संबंधित कंपनी व्हीलचेअर्सची विक्री करते. युजर्सना आकर्षित करण्यासाठी ती वापरत असलेल्या विविध कीवर्ड्सद्वारे येणाऱ्या ट्रॅफिकचा सोर्स; तसेच विविध सर्च इंजिन्समधून या कीवर्डमुळे येणारे ट्रॅफिक या गोष्टी स्क्रीनशॉटमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तुमचे एसईओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरते आहे की नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी फक्त नॉन-पेड ट्रॅफिककडेच बघणे महत्त्वाचे आहे.
कीवर्ड रिसर्च टूल्स
सुरुवात करण्यासाठी गुगल ॲडवर्ड्स कीवर्ड प्लॅनर चांगले आहे. तुम्ही एक कीवर्ड टाकू शकता, अनेक कीवर्ड टाकू शकता किंवा अगदी वेबसाइटचे ॲड्रेसेससुद्धा टाकू शकता आणि गुगल तुम्हाला त्या कीवर्डशी संबंधित यादी आणि त्याचबरोबर प्रत्येक कीवर्डभोवती किती जोरदार स्पर्धा आहे हे दाखवणारे; तसेच त्या कीवर्डबाबत जागतिक आणि स्थानिक पातळीवर शोध घेतला जातो याबाबतचे मेट्रिक्सही दाखवते. उदाहरणार्थ, मला शूजच्या विक्रीशी संबंधित कीवर्ड्स सर्च करायचे असतील, तर मी गुगल ॲडवर्ड्स कीवर्ड प्लॅनरमध्ये जाईन, कीवर्ड टाइप करीन आणि मग खाली रिझल्ट्स येतील. तुम्ही खाली बघितलेल्या स्क्रीनशॉटकडे बघितले, तर तुम्हाला दिसेल, की दर महिन्याला ‘shoes’साठी १ ते १० लाख सर्चेस असतात. हा प्लॅनर मला ‘nike shoes’सारख्या काही इतर संबंधित कीवर्ड्चेही सजेशन्स देतो आहे आणि त्यांच्यासाठी स्पर्धा किती आहे हेही दाखवत आहे.
अभ्यासासाठी आणखी एक टूल म्हणजे गुगल ट्रेंड्स. या टूलमध्ये अनेक कीवर्ड्स टाकता येतात आणि लोकेशन, सर्च हिस्टरी आणि कॅटेगरीनुसार ते फिल्टर करता येतात. त्यानंतर तुम्हाला संबंधित कीवर्डबाबत किती वेब इंटरेस्ट आहे, कशामुळे हा इंटरेस्ट तयार झाला (माध्यमांतील बातम्या), ट्रॅफिक कुठून येते आणि तशाच प्रकारचे इतर कीवर्ड्स कोणते आहेत आदींबाबत रिझल्ट्स दाखवले जातात.
अधिकाधिक कीवर्ड्स स्वतःच करा सर्च
वेब ॲनॅलिटिक्स डेटा किंवा कीवर्ड रिसर्च टूलचा वापर करण्याबरोबरच आणखी एक सोपी गोष्ट म्हणजे स्वतःच सर्च इंजिनवर जा आणि काही सर्चेस करून बघा. सर्च इंजिन्सचा वापर केल्यामुळे तुम्हाला या गोष्टी कळतील :
या क्षेत्रात किती स्पर्धा आहे?
तिथे येणारे सर्च रिझल्ट्स बघा. त्या कीवर्डसाठी हजारो किंवा लाखो रिझल्ट्स येत असतील, तर तिथे वेळ आणि कष्ट वाया घालवायचे का, हा प्रश्न स्वतःलाच विचारून बघा.
तुमचे स्पर्धक कुठे आहेत?
जो कीवर्ड तुम्हाला ऑप्टिमाइझ करायचा आहे तो सर्च करा आणि पहिल्या वीस रिझल्ट्सकडे बघा. तुमचे स्पर्धक तिथे कुठे दिसत आहेत का? तुमची रँक काय आहे? तुम्ही रँक तरी होत आहात की नाही? या सगळ्या माहितीतून तुम्हाला एक दिशा मिळेल आणि तुम्ही स्वतःची वेगळी वाट आखू शकाल. तुमचे स्पर्धक जिथे नाहीत असे कीवर्ड्स निवडण्याचा किंवा एखाद्या कीवर्डबाबत फार पुढे न जाण्याचा निर्णय तुम्हाला घेता येईल.
गुगल इतर काही सुचवत आहे का?
तुम्ही कीवर्ड गुगलवर टाइप करत असता, तेव्हा ते आपोआप टाइप करत असताना तो एकेक रिझल्ट्स दाखवत असते. या सुविधेला गुगल इन्स्टंट असे म्हटले जाते. तुम्ही नक्की कोणता सर्च करत आहात त्याबाबत अंदाज बांधण्याचा हा गुगलचा प्रयत्न असतो. थोडक्यात, आधीच्या सर्च डेटानुसार गुगल हे रिझल्ट्स दाखवत असते. या डेटाचा वापर तूम्ही करून घेऊ शकता. कीवर्ड टाइप करायला लागा आणि गुगल कशा प्रकारे कीवर्ड्स दाखवत जाते ते बघा.
Edited By - Prashant Patil
from News Story Feeds https://ift.tt/3jOTfxT
Comments
Post a Comment