'टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

नागपूर - आपण दररोज दातांची स्वच्छता करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतो. त्यावर आपल्याला लाल, हिरव्या, काळ्या आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या दिसतात. पण, या पट्ट्या नेमक्या कशासाठी असतात? याबाबत अनेकजणांना माहिती नसते. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

तिन्ही पट्ट्यांबाबत गैरसमज -
टूथपेस्टच्या ट्युबवरील निळ्या पट्टीचा अर्थ म्हणजे 'औषधी टूथपेस्ट', हिरवी म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक, लाल पट्टी म्हणजे नैसर्गिक आणि रसायनाचे मिश्रण, असे व्हायरल मेसेज सोशल मीडियावर फिरत असतात. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. तसेच काळ्या रंगाची पट्टी असेल तर त्या टूथपेस्टमध्ये जास्त रसायन असते. त्यामुळे ती वापरू नये, अशी देखील अफवा आहे. मात्र, काळी पट्टी असलेले टूथपेस्ट चांगले असते. 

हेही वाचा - नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपकडून संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर

रंगीत पट्ट्यांचा खरा अर्थ -
टूथपेस्टच्या ट्यूबवर असलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या मानवांसाठी निरुपयोगी आहेत. त्याचा मानवाच्या आरोग्याशी काहीही संबंध नाही. रंगीत पट्ट्या या ट्यूब उत्पादनाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्याचा आणि टूथपेस्टमधील रसायनांचा काहीही संबंध नसतो. रंगीत मार्कला 'आय मार्क' म्हणतात. ट्यूबला कुठे कापायचे आणि फोल्ड करायचे याची सूचना मशिनला देण्याचे काम हे मार्क करीत असतात. कोलगेट कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा कलर मार्क/कोड विषयक मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रंगावरून कोणती टूथपेस्ट आरोग्यासाठी चांगली हे सांगणारे व्हायरल मेसेज तुमच्याकडेही पोहोचले असतील तर त्याला बळी पडू नका. तुम्हाला वाटत असल्यास कुठलं टूथपेस्ट वापरायचं याबाबत तुमच्या डेंटिंस्टचा सल्ला घ्या. 
 



from News Story Feeds https://ift.tt/3n8UOsv

Comments

clue frame