जिओचे रोज ३ जीबी डेटाचे प्लान, ८४ दिवसांच्या वैधतेसह हे बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान ऑफर केले आहेत. काही प्लानध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे तर काही प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी युजर्संना रोज ३ जीबी डेटा मिळणाऱ्या प्लानसंबंधी खास माहिती देणार आहोत. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत असून या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानची किंत ३४९ रुपयांपासून सुरू होते. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः जिओचा ३४९ रुपयांचा प्लान जिओचा हा सर्वात स्वस्त प्लान आहे. ज्यात रोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात युजर्संना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. कॉलिंगसाठी जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कसाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. या प्लानमध्ये युजर्संना रोज १०० एसएमएस मिळते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा ४०१ रुपयांचा प्लान ४०१ रुपयांचा प्लान हा जवळपास ३४९ रुपयांच्या प्लानसारखाच आहे. परंतु, यात अतिरिक्त चार्जसाठी १ वर्षासाठी डिज्नी प्लस हॉ़टस्टारचे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच यात अतिरिक्त ६ जीबी डेटा दिला जातो. प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात एकूण ९० जीबी डेटा दिला जातो. तसेच जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स दिले जाते. वाचाः जिओचा ९९९ रुपयांचा प्लान जिओचा हा तिसरा प्लान आहे. ज्यात रोज ३ जीबी डेटा दिला जातो. या प्लानध्ये युजर्संना एकूण २५२ जीबी डेटा दिला जातो. कॉलिंगसाठी जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी ३ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळते. रोज १०० एसएमएस शिवाय या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33o6yjw

Comments

clue frame