नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपन्या आपल्या डिव्हाइसेजला दोन किंवा तीन मोठ्या अँड्रॉयड अपडेट्स देते. परंतु, याशिवाय जास्त कंपन्याकडून कमीत कमी तीन वर्षापर्यंत सिक्योरिटी अपडेट सुद्धा युजर्संना दिले जाते. तीन वर्ष जुन्या फोनला कोणतेही अपडेट मिळाले असले तरी दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. सॅमसंगने ५ वर्ष जुन्या आपल्या चार स्मार्टफोन्सला नवीन अपडेट रोलआउट केले आहे. वाचाः सॅमसंगकडून ज्या जुन्या स्मार्टफोन्सला आता अपडेट दिले जात आहे. त्यात Galaxy S6, , Edge+ आणि या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या चारही स्मार्टफोन्सला कंपनीकडून २०१५ मध्ये लाँच करण्यात आले होते. या सॅमसंग प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी अधिकृत सपोर्ट रिलीज तीन वर्षापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये संपले होते. परंतु, त्यानंतर सुद्धा या फोनला २०१९ चे सिक्योरिटी पॅच मिळाले होते. वाचाः कोणतेही नवीन फीचर नाही UAE मध्ये खूप यूजर्स ला Galaxy S6 सीरीज च्या डिवाइसेजवर नवीन अपडेट मिळाले आहे. तसेच सोबत Galaxy Note 5 ला सिक्योरिटी अपडेट दिले जात आहे. गंमत म्हणजे नवीन अपडेट मुळे सिक्योरिटी पॅच लेवल वाढला नाही की नवीन फीचर्स या डिव्हाईसेजमध्ये समावेश करण्यात आले. सॅममोबाइलच्या माहितीनुसार, नवीन अपडेट मध्ये सिक्योरिटी संबंधी कोणतेही स्टेबलायझेशन कोड आवश्यक आहे. वाचाः म्हणून मिळाले अपडेट सॅमसंगला या डिव्हाइसेजमध्ये काही कमतरता दिसली होती. मोठ्या सिक्योरिटी बगची माहिती उघड झाली होती. याला फिक्स करण्यासाठी कंपनीने हे अपटेड रोलआउट केले आहे. सरप्राईज अपडेट दक्षिण कोरिया शिवाय, यूरोप आणि लॅटिन अमेरिकेतील काही देशातील युजर्संपर्यंत पोहोचले आहे. जर तुमच्याकडे या डिव्हाइसेपैकी एखादे डिव्हाईस असेल तर सेटिंग्स मध्ये जावून अपडेट चेक करू शकता. अपडेट नंतर हे फोन अँड्रॉयड ७.० वर काम करतील. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nFMf8K
Comments
Post a Comment