१० हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स, जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः जर तुम्हाला १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला खास फोनची माहिती देत आहोत. या फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी असून या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिलेले आहेत. जाणून घ्या या फोनविषयी.... वाचाः रियलमीच्या या फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. १२ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः moto e7 plus या फोनची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. यात ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ऑक्टा कोर प्रोसेसर आणि अँड्रॉयड १० दिला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. हँडसेटमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासोबत २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः POCO C3 ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबीच्या या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले, ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसेच १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः infinix hot 10 (1) ४ जीबी रॅम फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ऑक्टा कोर प्रोसेसर, 5200mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. १६ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः Lg W11 या फोनची किंमत ९ हजार ४९० रुपये आहे. या फोनमध्ये ६.५२ इंचाचा डिस्प्ले, ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे. रियरवर १३ मेगापिक्सलचे दोन रियर आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UAURB6

Comments

clue frame