वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना बसणार झटका, महाग होणार टॅरिफ

नवी दिल्लीः वोडाफोन आयडिया () कडून टॅरिफ वाढवण्यात येणार आहे. आता ईटी टेलिकॉमच्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे की, टेलिकॉम कंपनी टॅरिफ रेट्स १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. या संबंधी दोन लोकांनी आमचे सहकारी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, टॅरिफ रेट्स मध्ये २०२० च्या अखेरला किंवा २०२१ च्या सुरुवातीला वाढवण्यात येणार आहे. वाचाः ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही परिणामांची घोषणा करताना वोडाफोन आयडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ आधी कंपनी टॅरिफ किंमत वाढवू शकते. आतापर्यंत एअरटेल आणि जिओ टॅरिफच्या वाढ प्रकरणी शांत आहे. परंतु, वोडाफोन आयडियाला अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच कंपनीला लागोपाठ सब्सक्रायबर्स गमावण्याची वेळ आली आहे. वाचाः ईटी टेलिकॉमशी बोलताना एका व्यक्तीने सांगितले की, कंपनी टॅरिफ रेट्समध्ये वाढ करू शकते. कारण, कंपन्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी द्वारा फ्लोर किंमत ठरवण्याची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे सूत्रांनी सांगितले की, डिसेंबर मध्ये टॅरिफ किंमतीत वाढ करू शकते. वोडाफोन आयडियाची आपली आर्थिक परिस्थिती पाहता ही वाढ करू शकते. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये टॅरिफ वाढीची घोषणा करणारी पहिली टेलिकॉम ऑपरेटर बनली होती. वाचाः भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ टॅरिफ किंमत वाढवण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. याशिवाय, रिपोर्टमध्ये वोडाफोन आयडियाने टॅरिफ हाईक संबंधी इंटरनल चर्चा केली आहे. वोडाफोन आयडिया कमीत कमी १५ टक्के टॅरिफ वाढ करू शकते. गेल्यावेळी कंपनी १४ टक्के टॅरिफ रेट्स वाढवली होते. वोडाफोन-आयडिया आधीपासून अडचणीचा सामना करीत आहे. ट्रायकडून रिलीज करण्यात आलेल्या ऑगस्ट २०२० च्या सब्सक्रिप्शन डेटा पाहता कंपनीने १० लाखांहून जास्त युजर्स गमावले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pyKQ60

Comments

clue frame