नवी दिल्लीः टेक ब्रँड ओप्पो अत्याधुनिक फीचर्स आणण्यात नेहमीच अग्रेसर आहे. आता कंपनीकडून असे एक डिव्हाइस पेटेंट आणले आहे. ज्यात गोल पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच नवीन डिव्हाईसमध्ये कंपनी 15x हायब्रिड झूम सपोर्टचा कॅमेरा मॉड्यूल देणार आहे. कंपनी Oppo Inno Day 2020 कॉन्फ्रेंस दरम्यान नवी डिव्हाईसेज आणि कॉन्टेप्ट वरून पडदा हटवू शकते. वाचाः पेटेंट आणि ट्रेडमार्क संबंधी कवरेज करणारी LetsGoDigitalकडून नुकतीच ओप्पोच्या नवीन पेटेंट संबंधी काही रिपोर्ट्स शेयर करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात पब्लिकेशनकडून ओप्पो स्मार्टफोन डिझाइन शेयर करण्यात आले आहे. याचा डिस्प्ले खेचून मोठा केला जावू शकतो. कंपनीकडून कन्फर्म करण्यात आले आहे की, काँफ्रेसमध्ये एका डिव्हाइसवरून पडदा हटवला आहे. कंपनी खूप दिवसांपासून रोलेबल डिस्प्लेचा एक फोनवर काम करीत आहे. वाचाः 15x झूमचा ट्रिपल कॅमेरा आणखी एक ओप्पो फोनचे पेटेंट समोर आले आहे. याचे पेटेंट गुंआंगडाँग ओप्पो मोबाइल टेलिकम्यूनिकेशनकडून एप्रिलमध्ये फाइल करण्यात आले होते. याला १२ नोव्हेंब रोजी मंजूर करण्यात तसेच पब्लिश करण्यात आले होते. या फोनमध्ये सिंगल गोल पॉप अप सेल्फी कॅमेरा मॉड्यूल दिले आहे. फोनच्या रियर पॅनेलवर मिळणाऱ्या ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये १५ एक्स झूम युजर्संना मिळणार आहे. फोनच्या डिझाईनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक पाहायला मिळाला आहे. वाचाः पेरिस्कोप लेन्सचा सेटअप फोनच्या प्रायमरी कॅमेरा मॉड्यूल मध्ये तीन सेन्सर दिले आहे. या मॉड्यूलमध्ये डावीकडून तिसरा सेन्सर एक पेरिस्कोप लेन्स आहे. समोर आलेल्या पेटेंट डॉक्यूमेंटमध्ये जी डिझाईन समोर आली आहे. त्याचा मेन कॅमेरा सेटअप Galaxy S10 आणि Meizu 17 Series प्रमाणे हॉरिजेंटल दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IIF1Cg
Comments
Post a Comment