नवी दिल्ली - भारतातील कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी आघाडीची कंपनी असलेली ह्युंडाई मोटार इंडिया लिमिटेडने आता ऑल न्यू 2020 i20 कार लाँच केली आहे. नव्या Hyundai i20 मध्ये ग्राहकांना तीन इंजिनचे पर्याय दिले असून त्यासोबत 13 कलर व्हेरिअंटचा पर्यायसुद्धा आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने कार लाँच केली आहे.
नवी Hyundai i20 अनेक रंगात उपलब्ध आहे. यामध्ये पोलर व्हाइट, टायफून सिल्वर, टायटन ग्रे, फेरी रेड, स्टेरी नाइट आणि मेटॅलिक कॉपर या रंगांचा समावेश आहे. याशिवाय पोलर व्हाइट आणि फेरी रेडमध्ये ब्लॅक रूफचा ऑप्शनही आहे. कंपनीने ही कार तीन इंजिनमध्ये लाँच केली आहे. यात 1.2-लीटर Kappa पेट्रोल, 1.5 लीटर डीझेल आणि 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटसह इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशनसुद्धा देण्यात आलं आहे.
हे वाचा - Google Pay नव्या रुपात; आयकॉनमध्ये बदल
पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असलेल्या कारमध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पायर्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. याची क्षमता 83hp इतकी असून 115Nm टॉर्क जनरेट होतो. इतर पेट्रोल ऑप्शनमध्ये1.0 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन असून याची क्षमता 120hp इतकी आहे. तसंच 172Nm टॉर्क जनरेट होतो. 1.2 लीटर पेट्रोलमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. 1.0-लीटर टर्बो पेट्रोल कारमध्ये 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.
ह्युंडाइने ऑल न्यू Hyundai i20 कार 6.80 लाख रुपयांपासून 10.60 लाख रुपयांपर्यंत ठेवली आहे. यामध्ये पेट्रोल व्हेरिअंटची कमीत कमी किंमत 6.80 लाख रुपये असून डिझेल व्हेरिअंटची किमान किंमत 8.20 लाख रुपये इतकी आहे.
from News Story Feeds https://ift.tt/38js24h
Comments
Post a Comment