Airtel vs Jio vs Vi vs BSNL: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्रीपेड प्लान

नवी दिल्लीः एअरटेल, जिओ वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलकडे अनेक अनलिमिटेड डेटा आणि व्हाइस कॉलिंगचे बेनिफिट्स प्रीपेड प्लान आहेत. ग्राहकांसाठी आपल्या गरजेनुसार प्लानची निवड करणे मोठे जिकीरीचे काम झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बेस्ट अनलिमिटेड बेनिफिटचे प्रीपेड प्लान्स संबंधी माहिती देत आहोत. वाचाः बीएसएनएलचा एसटीव्ही २४७ रुपयांचा प्लान ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत एसटीव्ही २४७ बीएसएनएलचा सर्वात बेस्ट अनलिमिटेड प्रीपेड प्लानचा समावेश आहे. या प्लानमध्ये ३ जीबी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग (रोज २५० मिनिट) आणि १०० एसएमएस रोज या प्लानमध्ये मिळते. डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 80Kbps होते. तसचे युजर्संना Eros Now आणि BSNL Tunes चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः ४४९ रुपयांचा एअरटेल प्लान एअरटेलचा ४४९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. तसेच देशभरात कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग फ्री मिळते. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. हा प्लान ५६ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. एअरटेलच्या या प्लानमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम आणि १ वर्षासाठी शॉ अकादमी, विंक म्यूझिक आदीचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळते. वाचाः ४४४ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओकडे ४४४ रुपयांचा बेस्ट अनलिमिटेड प्रीपेड प्लान आहे. याची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २ हजार मिनिट्स मिळतात. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्रीमध्ये मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मिळते. वाचाः ४४९ रुपयांचा वोडाफोन-आयडियाचा प्लान ४४९ रुपयांच्या वोडाफोन-आयडियाच्या प्रीपेड प्लानमध्ये डबल डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच ग्राहकांना ४ जीबी डेटाचा फायदा मिळू शकतो. या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग फ्री आहे. रोज १०० एसएमएस मिळते. युजर्सला वोडाफोन-आयडियामध्ये विकेंड डेटा रोलओवर करण्याची सुविधा मिळते. तसेच युजर्संना Vi Movies & Tv चे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/390APIY

Comments

Post a Comment

clue frame