Airtel ग्राहकांना फ्री मध्ये मिळतोय 5GB डेटा, डाउनलोड करा Airtel Thanks App

नवी दिल्लीः भारती एअरटेलने 'New 4G SIM or 4G Upgrade Free Data Coupons' नावाने एक नवीन ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत नवीन एअरटेल ग्राहकांना ५ जीबी डेटा दिला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन एअरटेल युजर्संना पहिल्यांदा एअरटेल थँक्स अॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर १ जीबी चे ५ कूपन मिळतील. वाचाः एअरटेल त्या ग्राहकांना ५ जीबी डेटा देत आहे. ज्यांनी नवीन ४ जी सिम खरेदी केले आहे किंवा ४ जी डिव्हाइसवर अपग्रेड केले आहे. पहिल्यांदा प्रीपेड मोबाइल नंबरचा वापर करून एअरटेल थँक्स अॅपसाठी रजिस्टर केले आहे. ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत भारती एअरटेलने ४ वर्षात पहिल्यांदा रिलायन्स जिओहून जास्त ४ जी सब्सक्रायबर्स जोडले आहे. वाचाः ५जी डेटा ऑफर असा मिळणार फ्री ही ऑफर मिळवण्यासाठी प्रीपेड ४ जी सब्सक्रायबर्सला गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल अॅप स्टोरवरून एअरटेल थँक्स अॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावे लागेल. डाउनलोड केल्यानंतर युजरला मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागेल. एअरटेलच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक युजरच्या अकाउंटमध्ये ७२ तासांच्या आत १ जीबी चे पाच कूपन क्रेडिट केले जातील. वाचाः ही ऑफर मिळवण्यासाठी काही नियम व अटी आहेत. कोणत्याही युजरला एकाच मोबाइल नंबरचा वापर एकदाच या ऑफरसाठी करावा लागणार आहे. एअरटेलने हेही म्हटले की, जर युजर ५जीबी डेटा फ्री मिळवण्यात योग्य असेल तर आता मिळत असलेला २जीबी डेटा फ्री ऑफरच्या बाहेर जाईल. एअरटेलने आता हेही सांगितले की, क्वॉलीफाइ होण्यासाठी विजेत्याला ऑटोमेटिकली कूपन क्रेडिट झाल्याचा मेसेज येईल. एसएमएस मिळाल्यानंतर एअरटेल थँक्स अॅपच्या माय कूपन्स सेक्शनमध्ये जावून आपले कूपन व्ह्यू क्लेम करू शकता. क्रेडिट झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत १ जीबीचे कूपन रिडिम केले जावू शकते. हे तीन दिवसांसाठी वैध असणार आहे. तिसऱ्या दिवसांनंतर आपोआप एक्सपायर होईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33oj56p

Comments

clue frame